Sangamner Crime News Saam tv
क्राईम

Sangamner Crime News : अहमदनगर हादरले; मुलीवर अत्याचार, पीडितेने संपविले जीवन

Ahmednagar News : मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर पिडीत मुलीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची झाल्याची घटना (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. सदरच्या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पठार भागामध्ये वास्तव्यास असलेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. अत्याचार झाल्यानंतर त्याच दिवशी पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या (Crime News) प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी सौरभ खेमनर, योगेश खेमनर, प्रशांत खेमनर, विकास गुंड, आरानी विजय खेमनर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा; असा आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT