Ahmednagar Latest News:  Saam Digital
क्राईम

Ahmednagar Crime: थरारक... कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तलवार कोयत्याने वार करत रोख रक्कम लुटली, नगर हादरलं!

Ahmednagar Crime News: हल्लेखोरांनी व्यापार्‍यावर तलवार, कोयत्याने वार करून त्याच्या जवळील रोख रक्कम चोरून नेण्यात आली असून या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ७ ऑगस्ट २०२४

Attack On Onion Trador: अहमदनगरमध्ये भररस्त्यात एका कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरमध्ये बायपास रोडवर असणाऱ्या कांदा मार्केटसमोर ही घटना घडली. हल्लेखोरांनी व्यापार्‍यावर तलवार, कोयत्याने वार करून त्याच्या जवळील रोख रक्कम चोरून नेण्यात आली असून या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगरमध्ये एका कांदा व्यापाऱ्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या बायपास रोडवरील कांदा मार्केटसमोर हा थरार घडला. यावेळी हल्लेखोरांनी व्यापार्‍यावर तलवार, कोयत्याने वार प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळी ११ च्या सुमारास आडते व कांदा व्यापारी सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते. याचवेळी बायपास रोडवर काही तरुणांनी त्यांना तलवार कोयत्याचा धाक दाखवून वार करुन हल्ला चढवला. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम लुटून पोबारा केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT