Crime News Saam tv
क्राईम

Crime News : घरातली भांडणं, क्षुल्लक कारणावरून पतीनं क्रूरपणे पत्नीला संपवलं, ४ मुलं झाली पोरकी

Crime News: अहमदाबादमध्ये सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ahmedabad Crime News :

अहमदाबादमध्ये सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संशयित आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून शरण गेला.

यासंदर्भात रामोल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपी अहेजाज खान आणि त्याची पत्नी कुरेशाबानो यांच्यात घरगुती कारणांवरून सतत भांडणं व्हायची. सोमवारी सकाळी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडण झाले. त्यानंतर अहेजाजनं पत्नीची निर्घृण हत्या केली.

अहेजाज खान हा रिक्षाचालक आहे. तो पत्नी कुरेशाबानासह चार मुलांसोबत रामोलच्या शालीमार चाळीत राहत होते. अहेजाज हा दीड वर्षापूर्वीच त्याचे मूळ गाव अमेठीहून अहमदाबाद येथे राहायला आला होता. ज्या महिलेची हत्या झाली ती आणि तिचे पाच भाऊ एकाच चाळीमध्ये राहत होते. या महिलेच्या घराच्या शेजारीच भावाचे घर आहे.

या दाम्पत्याच्या १३ वर्षीय मुलीनं तिची लहान भावंडं जोरजोरात रडत असल्याचं बघितलं. वडिलांनी त्यांच्या आईवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक वार केले. त्यानंतर डोक्यातही वार केला. त्यानंतर तेथून तो पसार झाला. आईला निपचित पडल्याचे बघून मुलानं जवळच राहत असलेल्या मामाकडे धाव घेतली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कुरेशाबानच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार,अहेजाज खान जास्त कमवत नव्हता. कुरेशाबानो आणि त्याच्यात वारंवार खटके उडत होते. त्यामुळेच कुरेशाबानोच्या भावांनी त्यांना चाळीत राहण्याची विनंती केली होती. जेणेकरून तो तिचा छळ थांबवेल. आरोपीने त्याच्या रिक्षात ठेवलेल्या स्क्रू ड्रायव्हरने तिची हत्या केली आणि त्यानंतर पोलिसांना शरण गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT