Jamkhed youth reel hanging Saam Tv News
क्राईम

Ahilyanagar Crime : रीलच्या नादात नको तो आगाऊपणा, गळफास घेतानाचा VIDEO बनवला; अचानक ओढणीचा फास आवळला अन्...

Ahilyanagar Man Hanged Himself Making a Reel : प्रकाश भीम बुडा (वय १७) असं या युवकाचं नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे.

Prashant Patil

अहिल्यानगर : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात अनेक तरुण-तरुणी जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील जामखेड शहरात घडली आहे. गळफास घेतानाचा रील बनवण्याच्या नादात एक तरुण प्रत्यक्षात त्या दोराच्या फासात अडकला. दरम्यान, यावेळी रील काढणाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना वेळीच संपर्क केल्यानं त्याचा जीव सुदैवाने वाचला असला, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.

प्रकाश भीम बुडा (वय १७) असं या युवकाचं नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर रील व्हायरल करण्याच्या उद्देशाने त्याने गळफास घेण्याचा बनाव करत स्वतःचं चित्रीकरण सुरू केलं होतं. मात्र, दोरी गळ्याला अडकली आणि तो शुद्ध हरपून त्याला गळफास बसला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रकाशला खाली उतरवलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

प्रकाश हा मुळचा नेपाळचा असून तो अहिल्यानगरमध्ये एका हॉटेलमध्ये कामाला आहे. इंनस्टाग्रामवर रील व्हायरल करण्याच्या उद्देशाने त्याने एका झाडाच्या फांदीला ओढणी बांधली आणि स्वत: हवेत लोंबकळत सोडलं. मात्र, त्याचवेळी तो प्रकार त्याच्या अंगलट आला, अचानक ओढणीचा फास आवळला आणि त्याचा श्वास दाबला गेला, आणि तो तडफडू लागला. व्हिडिओ काढणाऱ्याच्या लक्षात येताच त्याने त्याला खाली उतरवलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुण-तरुणी जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करत असतात. मुंबईमध्ये चालत्या लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर पाय घसरवत जाणे, रस्त्यांवर दुचाकीवर मांडी घालून बाईक चालवणे असे स्टंट आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. अशातच बऱ्याच जणांचा जीव देखली गेलेला आहे. तरीही तरुणाईंच्या अंगातून स्वत: व्हायरल होण्याचं भूत काही उतरताना दिसत नाहीय. त्याचाच प्रत्यय हा अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यात बघायला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT