Chhattisgarh Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: धक्कादायक घटना! ऑर्केस्ट्रा ग्रुपमधील २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Chhattisgarh Crime News: एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमधील २१ वर्षीय तरुणीवर ३ लोकांनी अत्याचार केल्याची घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडलीय. रविवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार गुन्हेगार हे पीडितेच्या ओळखीचे होते.

Bharat Jadhav

Chhattisgarh Orchestra Crime News:

झारखंडच्या दुमका येथे एका स्पॅनिश पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्कार घडल्याची घटना होऊन अवघ्या २४ तासानंतर दुसरी एक घटना घडली. एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमधील २१ वर्षीय तरुणीवर ३ लोकांनी अत्याचार केल्याची घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडलीय. पलामू बिश्रामपूर पोलिसांत रविवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार गुन्हेगार हे पीडितेच्या ओळखीचे होते.(Latest News)

यातील दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय कुमार आणि दिवाना कुमार, अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गोलू हा फरार आहे. तिघांवरही आयपीसीच्या कलम ३२८ (दुखापत करणे) आणि ३७६ (२) (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींनी कार्यक्रमासाठी ऑर्केस्ट्रा डान्सरला बोलवलं होतं. गोलू कुमार नावाच्या आरोपीने महिला डान्सरला कार्यक्रमासाठी आंमत्रित केलं होतं. परंतु कार्यक्रम रद्द केल्याने डान्सर कुमारच्या घरात बसून राहिली, होती अशी माहिती, बिश्रामपूरचे एसडीपीओ राकेश सिंह म्हणाले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय पीडितेने आरोप केला आहे की, तिला पेय दिले गेले. ते प्यायल्याने ती बेशुद्ध झाली, त्यानंतर तिघांनी तिच्यावर अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT