Nagpur Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : नागपूर हादरलं! १२ वर्षांच्या मुलीला लॉजवर नेलं, नराधमांनी बलात्कार करून व्हिडिओ काढले

Nagpur Crime News : नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी करण आणि रोहित या दोघांना अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागपूर परिसरात संतापाची लाट आहे.

Alisha Khedekar

नागपूरमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

आरोपी करण आणि रोहित यांना पोलिसांनी अटक

आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कठोर कारवाईची मागणी

फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच नागपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कदायक म्हणजे या नराधमाने बलात्कार करतानाचे व्हिडिओ चित्रित करून चिमुकलीला धमकवल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जवळच्या भिलगाव परिसरात गुरुवारी खळबळजनक घटना घडली. दोन नराधम १२ वर्षाच्या मुलीला येथील एका लॉजवर घेऊन गेले. त्यानंतर या दोघांनी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता या दरम्यान त्यांनी व्हिडिओ देखील काढले. आणि पीडितेला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी चिमुकलीने कुटुंबियांना सांगितले असता पीडितेच्या पालकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही नराधमांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन गुन्हेगारांचं नाव करण आणि रोहित असून या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करण आणि रोहित दोघेही गुन्हेगारी क्षेत्रातील असून यापूर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान या आरोपींवर बलात्कार आणि पॉक्सोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र १२ वर्षांची मुलगी लॉजवर गेली कशी ? लॉज मालकाने परवानगी दिली कशी ? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही समोर आलेली नाहीत. या दोन आरोपींसोबत लॉज मालकाला सुद्धा शिक्षा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : आई-वडिलांच्या भेटीची आस अपूर्णच राहिली; कॅनडात भारतीय तरुणीचा दुर्दैवी अंत

Phaltan Doctor Death: फलटण टू बीड व्हाया पंढरपूर; ४८ तासात PSI गोपाल बदने कुठं-कुठं लपला?

भाजपला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का! २ बड्या नेत्यांसह २९ जणांनी कमळाची साथ सोडली

Dark Neck Remedy: मान अचानक काळीकुट्ट पडलीये? टेन्शन सोडा! फक्त फॉलो करा या टिप्स

Amruta Dhongade Photos: अमृताचा बोल्ड लूक, फोटोंनी इंटरनेटचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT