Nitrogen Gas For Punishment  AP PHOTO
क्राईम

Nitrogen Gas : नायट्रोजन गॅसने आरोपीला दिला मृत्यूदंड; शिक्षेसाठी गॅसचा वापर करणारा अमेरिका ठरला पहिला देश

Nitrogen Gas For Punishment : अमेरिकेत ३५ वर्षांपूर्वी एका अमेरिकन महिलेची हत्या झाली होती. स्मिथ नावाच्या व्यक्तीने सुपारी घेऊन तिची हत्या केली होती. दरम्यान ३५ वर्षानंतर स्मिथला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालीय.

Bharat Jadhav

Death Penalty By Nitrogen Gas In America:

अमेरिकन महिलेचा खून करणाऱ्या केनेथ यूजीन स्मिथला गुरुवारी संध्याकाळी अलाबामामध्ये नायट्रोजन वायूने ​​मृत्यूदंड देण्यात आला. भारतीय वेळेनुसार, स्मिथचा मृत्यू शुक्रवारी झाला. या घटनेनंतर अमेरिका शिक्षेसाठी गॅसचा उपयोग करणारा पहिला देश ठरलाय. आरोपीला शिक्षा देण्यासाठी नायट्रोजन गॅसचा वापर अमेरिकेने पहिल्यांदा केलाय. केनेथ यूजीन स्मिथ (वय ५८ ) , यांच्यावर यापूर्वी मृत्यूदंडाचा खटला चालवण्यात आला होता, परंतु तेव्हा तो वाचला होता. (Latest News)

३५ वर्षांनंतर मिळाली शिक्षा

३५ वर्षांपूर्वी एका अमेरिकन महिलेची हत्या झाली होती. स्मिथने सुपारी घेऊन या महिलेची त्या केली होती. या घटनेला आज ३५ वर्षे पूर्ण झाली आज मारेकरी स्मिथला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. याविषयीचे वृत्त यूएस डॉट कॉम या वृत्तसंस्थेने दिले आहे. मारेकरी स्मिथला मृत्यूदंडाची शिक्षा ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने देण्यात आलीय. याआधी २०२२ मध्ये त्याला विषारी इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यानंतर डेथ सेलमधील डॉक्टरांना त्याची रक्तवाहिनी सापडली नाही आणि अनेकवेळा इंजेक्शन देऊनही त्याचा जीव वाचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर अलाबामा कोर्टाने निर्णय दिला होता की स्मिथला नायट्रोजन वायूच्या मदतीने मारले जाईल आणि तेच घडले. २५ जानेवारीच्या संध्याकाळी त्याला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड देण्यात आला. स्मिथला दिलेल्या या मृत्यूबद्दल केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ उडालीय. याच कारण म्हणजे अमेरिकेतील असंख्य नागरिकांसह लाखो मानवाधिकार समर्थक स्मिथला दिलेल्या या मृत्यूच्या विरोधात आहेत. या क्रूरपणा असल्याचं मानवाधिकार समर्थक म्हणत होते.

याचिका फेटाळली

केनेथ स्मिथच्या वतीने अलाबामाच्या सुप्रीम कोर्टात मानवधिकार समर्थकाने या शिक्षेविरोधात अर्ज दाखल केला होता. ही शिक्षा क्रूरपणा आहे, त्याला माफी द्यावी, असं आवाहन या याचिका अर्जातून करण्यात आली होती. परंतु त्यांच्याबाबत जे काही होत आहे ते कायद्यानुसारच आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

नायट्रोजन गॅसने मृत्यूदंड म्हणजे काय?

नायट्रोजन गॅसने मृत्यूदंड देण्यासाठी स्मिथला आधी डेथ चेंबरमध्ये नेण्यात आले. जिथे त्याला स्ट्रेचरवर झोपवले गेले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हवाबंद मास्क लावण्यात आला. हा मास्कऑक्सिजन पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या मास्कच्या साह्याने नायट्रोजन गॅस सोडण्यात आला.

गॅस स्मिथच्या तोंडातून आणि त्याच्या नाकातून शरिरात गेला. त्याला ऑक्सीजन मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाला. किमान १५ मिनिटापर्यंत त्याच्या शरिरात गॅस सोडण्यात आला. नायट्रोजन गॅस शरिरात गेल्यानं तो बेशुद्ध झाला त्यानंतर काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

केनेथ स्मिथ कोण आहे?

केनेथ स्मिथला एलिझाबेथ सेनेटच्या हत्येप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा मिळालीय.एलिझाबेथ सेनेटचा नवरा चार्ल्स सेनेटने स्मिथला एलिझाबेथची हत्या करण्याची सुपारी दिली होती. कर्ज आणि प्रेमसंबंधामुळे त्याने तिची हत्या घडवली होती. एलिझाबेथ सेनेटला तिच्या घरात चाकू भोसकून मारण्यात आले. या हत्या प्रकरणात चार्ल्स सेनेटचा हात असल्याचं समोर आल्यानंतर त्याने आत्महत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT