acb held tashildar and kotwal in bribe case Saam Digital
क्राईम

Beed Crime : 20 हजाराची लाच घेताना तहसीलदारासह कोतवालावर केज पाेलिसांत गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसात तीन अधिकार्‍यांवर लाच घेताना थेट कारवाई करण्यात आली. लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याची गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar, विनोद जिरे

रेशन दुकानावर धान्याच्या आढळलेल्या तफावती बाबत कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोतवालासह तहसीलदारा विरोधात बीड येथील केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोतवालास लाच घेताना रंगेहात पकडले. तर तहसीलदार फरार आहे. केज येथील तहसीलदार अभिजीत जगताप व कोतवाल मच्छिंद्र माने यांनी तक्रारदाराच्या रेशन दुकानात सरकारकडून मिळालेले धान्य व ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत आढळल्यानंतर कारवाई न करण्याकरिता 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

यानंतर तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारताना माने याला पकडण्यात आले. ही कारवाई धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. दरम्यान या प्रकरणी बीडच्या केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green vs Red Apple : लाल की हिरवं? रोज कोणतं सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

बीडमध्ये एसटी बस अन् कारची भीषण धडक; पाच जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT