Abhishek Ghosalkar News Saam TV
क्राईम

Abhishek Ghosalkar News: ...तर घोसाळकरांचा जीव वाचला असता; गोळीबार प्रकरणी महत्वाची माहिती उघडकीस

Abhishek Ghosalkar Case Update: मॉरिसच्या आग्रहामुळे घोसाळकर आपल्या पत्नीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला न जाता मॉरिसच्या कार्यालयात पोहचले. तिथे गेल्यावर त्यांनी एक फेसबूक लाइव्ह केलं.

Ruchika Jadhav

अभिषेक घोसाळकर यांची हत्या:

गोळीबाराच्या घटनेनं कल्याणनंतर आता मुंबई हादरून गेली आहे. गुरुवारी सायंकाळी फेसबूक लाईव्ह सूरू असताना मॉरिस भाईकडून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेत घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या थरारक घटनेचा एकूण घटनाक्रम पाहता घोसाळकरांचा जीव वाचण्याची शक्याता होती असं दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयसी कॉलनी परिसरात हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला अभिषेक घोसाळकर देखील उपस्थित राहणार होते. घोसाळकर घरातून निघाले आणि मॉरिसने त्यांना फोन केला. हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला नंतर जा, आधी मला भेटायला या असा आग्रह त्याने केला.

मॉरिसच्या आग्रहामुळे घोसाळकर आपल्या पत्नीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला न जाता मॉरिसच्या कार्यालयात पोहचले. तिथे गेल्यावर त्यांनी एक फेसबूक लाइव्ह केलं. हे लाइव्ह संपल्यावर कॅमेरा सुरूच होतो. त्यावेळी मॉरिसने घोसाळकरांवर गोळीबार केला.

तर जीव वाचला असता...

अभिषेक घोसाळकर जर पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला आधी गेले असते तर कदाचित ते आज या जगात असते.

अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल

मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. तसेच रोहित शाहू आणि मेहुल पारेख या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT