money, nanded crime news saam tv
क्राईम

Crime News : मुख्याध्यापकाच्या बॅगेतील 90 हजार रुपये चाेरीस, स्टेट बॅंकेतच घडला प्रकार

दिवाळी सण जवळ असल्याने बाजारपेठेत सध्या नागरिकांची खरेदीची लगबग सुरु आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded Crime News : बँकेतून पैसे काढल्यानंतर चोरट्यांनी बॅगेतून 90 हजार रुपये पळवल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली. या घटनेची नाेंद हिमायतनगर पाेलीसांत झाली आहे. पाेलीस संशयितांचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

या घटनेतील फिर्यादी साहेबराव देशमुख हे मुख्याध्यापक आहेत. ते हिमायतनगर मधील भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून त्यांनी 90 हजार रुपये काढले. बॅगेमध्ये पैसे टाकून त्यांनी बॅग पाठीवर अडकवली.

त्यांच्यावर दोन चोरटे पाळत ठेऊन होते असे पाेलीसांना सीसीटीव्हीत आढळून आले आहे. पाेलीस म्हणाले साहेबराव देशमुख बँकेत असताना एक चोरटा पिशवी घेऊन त्यांच्या मागे खेटून चालू लागला. बॅगेची चेन काढून त्याने अलगद आपल्या पिशवीमध्ये पैसे काढून घेतले.

चोरी होताना थोडीही शंका देशमुख यांना आली नाही. पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरी नेमकी कशी झाले हे लक्षात आले आहे. सीसीटिव्ही फुटेज वरून चोरट्यांचा शोध घेत आहेत असेही पोलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान दिवाळीनिमित्त (Diwali Festival) बाजारपेठेत येताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT