8 held in pimpri chinchwad online task cyber crime Saam Digital
क्राईम

Pimpri Chinhcwad : ऑनलाइन टास्क देत 20 कोटींचा घातला गंडा, सायबर गुन्हे शाखेने 8 जणांना ठाेकल्या बेडया (पाहा व्हिडिओ)

8 held in pimpri chinchwad online task cyber crime : याबराेबरच किरण खेडेकर आणि हाफिज शेख हे दोन मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सायबर गुन्हे शाखा पोलीस घेतं आहेत.

गोपाल मोटघरे

लोकांना सोशल मीडियावर ऑनलाइन टास्क देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एका टोळीला नुकतीच अटक केली आहे. या टाेळीने वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नागरिकांचे कागदपत्र वापरून बँक खाते देखील उघडल्याची माहिती समाेर आली आहे.

साेशल मिडीयातून सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीने वेगवेगळ्या बँकेत बँक अकाउंट उघडून नागरिकांना 20 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समाेर आले आहे. या टोळतील अल्ताफ मेहबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्णा भगवान खेडेकर असे आठ जणांना सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाइन सायबर फ्राॅड करण्यासाठी या टोळीने नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे मुळ कागदपत्र घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक खाते उघडत असे. बँक खाते उघडल्यानंतर त्या खात्यात वापरण्याच्या बदल्यात त्या नागरिकांना दोन हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम देत होते असं पोलिस तपासांत उघडकीस आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT