crime news X
क्राईम

विद्यार्थ्याला शिक्षकाने चापट मारली, कान-तोंडातून रक्त आले, ४ वर्षाच्या चिमुकल्याचा भयंकर मृत्यू

Nursery Student’s Death : प्रयागराजमध्ये शिक्षकाच्या चापटामुळे ४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नाक-तोंडातून रक्त आल्याची माहिती आहे. पोस्टमॉर्टम अहवालात शरीरावर जखमा आढळल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

प्रयागराजमधील खासगी शाळेत नर्सरीच्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्याला टीचरने चापट मारली. त्यानंतर कान आणि तोंडातून रक्त आले अन् चिमुकल्याचा भयंकर मृत्यू झाला. चार वर्षाच्या मुलाचे नाव शिवाय असे आहे. चार वर्षाच्या शिवायच्या मृत्यूने संपूर्ण प्रयागराजमध्ये खळबळ उडाली आहे. टीचरने मारलेल्या चापटीमुळे शिवायचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोस्टमॉर्टम अहवालात मुलाच्या शरीरावर अनेक जखमांचे निशाण आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

प्रयागराज येथील नैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेवा पश्चिम पट्टी येथे राहणाऱ्या वीरेंद्र यांचा चार वर्षीय मुलगा शिवाय हा डीडीएस ज्युनिअर हायस्कूलमध्ये नर्सरीमध्ये शिकत होता. याच शाळेत त्याचा मोठा भाऊ सुमित आणि बहीण पूर्वी याही शिकतात. सुमितने सांगितले की, शिवाय रडत होता, तेव्हा टीचर त्याला सुमितच्या वर्गात घेऊन आली आणि बाकड्यावर बसवले. मात्र, शिवायने रडणे थांबवले नाही, त्यामुळे टीचरने त्याला जोरदार चापट मारली. यामुळे त्याचे डोके बाकड्यावर आपटले आणि तो खाली पडला. पडताच त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. शिवाय सतत पाणी मागत होता, पण टीचरने त्याला पाणी दिले नाही. सुमारे दहा मिनिटांनंतर त्याची हालचाल थांबली. टीचरने त्याला हलवून पाहिले, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर टीचरने पालकांना फोन करून बोलावले. कुटुंबीयांनी शिवायला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासे

शिवायच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी शिक्षकांवर मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोस्टममार्टम केला. डीसीपी गंगा नगर विवेक यादव यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात शिवायच्या शरीरावर तीन ठिकाणी जखमांचे निशाण आढळले. त्याच्या भुवया, पाय आणि खाजगी अवयवांवर जखमा होत्या. हे निशाण शाळेतील मारहाणीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT