Bhandara Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

Bhandara Crime News : भंडाऱ्यातील आथली गावात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केली. “तुम्ही आमच्यासाठी काय केलं?” असा प्रश्न विचारत मुलानेच वडिलांचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

भंडाऱ्यात मुलाने वडिलांची केली हत्या

“तुम्ही आमच्यासाठी काय केलं?” मुलाने वडिलांना विचारला प्रश्न

वित्त फेकून मारल्याने वडिलांचा जागीच मृत्यू

आईच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे

भंडाऱ्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुण मुलाने तुम्ही आमच्यासाठी काय केलं? विचारत वडिलांची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हल्ल्यात पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मृत पुरुषोत्तम यांचा मुलगा प्रदीप कुंभलवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील आथली गावात राहणाऱ्या कुंभलवार यांचे वारंवार कौटुंबिक वाद होत होते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रदीप आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाला. या वादात प्रदीपने वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आमचं लग्न तरी लावून दिलं का ? असा उलट सवाल विचारला. हा वाद इतका विकोपाला पेटला की प्रदीपने चक्क स्वयंपाक खोलीत असलेल्या विटेचा तुकडा हातात धरत वडिलांच्या डोक्यावर चक्क फेकून मारला.

या हल्ल्यात पुरुषोत्तम यांचा भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली. सदर घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी हलविण्यात आला.

सदर घटनेची फिर्याद मृतकच्या पत्नीने दिली असून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाखांदूर पोलिसांनी आरोपी प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT