26 lakh silver seized in sangli
26 lakh silver seized in sangli saam tv
क्राईम

Sangli Crime News : सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु

विजय पाटील

Sangli :

लाेकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात जिल्ह्यात अवैध गाेष्टींवर आळा बसावा यासाठी पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. पाेलिसांनी सांगलीत विनापरवाना वाहतूक होत असलेली तब्बल २६ लाखाची चांदी जप्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक आचारसंहितेमुळे सांगलीवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी गस्ती पथकाकडून करण्यात येते. यावेळी एका वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी मोटारीमध्ये २५ लाख ९२ हजार ११४ रूपये किंमतीचे ४१ किलो ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे तयार दागिने आढळून आले. (Maharashtra News)

वाहन चालक देवेंद्र बाबूलाल माळी (वय २०, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) याच्याकडे या चांदीच्या दागिन्याची वाहतूक करण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळला नाही. यामुळे गस्ती पथकातील निखील म्हांगोरे, शंकर भंडारी व प्रमोद भिसे या कर्मचार्‍यांनी चांदीच्या दागिन्यासह वाहन चालकाला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आचारसंहिता विशेषाधिकार समिती व प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून या दागिन्याचा उगम, विल्हेवाट यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT