Bhandara Accident Saam tv
क्राईम

Bhandara Accident: भंडाऱ्यामध्ये २ भीषण अपघात, ट्रक पुलावरून खाली कोसळला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण जखमी

Bhandara Accident: तसेच, तुमसर बालाघाट महामार्गावर जवळही एक मोठा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dhanshri Shintre

भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी चारचाकी वाहनाने गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावरील एलोरा पेपर मिल परिसरातून जात असताना त्याच्या वाहनाने एका गुराख्याला चिरडले. सदर गुरख्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. सदर अपघातग्रस्त चार चाकीची तोडफोड केली आणि सोबतच पोलीस कर्मचाऱ्यालाही मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याची माहिती आहे.

दरम्यान तो पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात हरवण्यात आले. त्यानंतर तात्काळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अजूनही पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

तसेच, तुमसर बालाघाट महामार्गावर जवळही एक मोठा भीषण अपघात घडला आहे. तुमसर बालाघाट महामार्गावर खैरलांजी जवळ भरघाव वेगाने बालाघाट दिशेने जात असलेला ट्रक चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रक पुला खाली पडल्याची घटना सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली.

या घटनेत वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी चालकाला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT