Jharkhand Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Jharkhand Crime News : झारखंडमध्ये १८ वर्षीय तरुणीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तिच्या चुलत भावाचाही सहभाग आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • झारखंडच्या रांची जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी बलात्कार केला

  • या प्रकरणात पीडितेच्या चुलत भावाचाही सहभाग असल्याचं उघड

  • पोलिसांनी सात जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून चौघांची ओळख पटली आहे

  • आरोपींना अटक करण्यासाठी झारखंड पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे

झारखंड हादरलं! झारखंडच्या रांची जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कदायक म्हणजे या घटनेत तिच्या भावाचाही हात असल्याचं समोर आलं आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून या घटनेने शहर हादरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेने याप्रकरणी मंगळवारी तामार पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली आहे. पीडितेने तक्रार नोंदवल्याप्रमाणे, तिच्या चुलत भावाने तिला मर्दान मोड येथील एका कर्यक्रमाला बोलावले. ३० सप्टेंबर रोजी ही तरुणी त्या कर्यक्रमाला गेली असता तिथे तिच्या भावाने दोन मित्रांना बोलावले.

या मित्रांपैकी एकाने पीडितेवर बलात्कार केला. तिथून पुढे या पीडितेला बुंदू येथे घेऊन गेले. बुंदूमध्ये, इतर तीन तरुणांनी तिचा विनयभंग केला. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता पीडितेला बुंदूहून रांची येथे नेण्यात आले. रांची येथे अजून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्यांनी तिला तामार परिसरातील मर्दान मोर येथे निर्जन स्थळी सोडले.

या घटनेनंतर पीडितेने काल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तामार पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चार आरोपींची ओळख पटली आहे, तर तिघांची ओळख पटलेली नाही. आरोपींना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. शिवाय पीडितेची आज वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत फोडाफोडी सुरूच! एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना धक्का, बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Zodiac Signs: चंद्र कन्या राशीत; काम, पैसा आणि नात्यांसाठी आजचा दिवस किती शुभ?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक भाकीत

8th Pay Commission: २०२८ मध्ये ८ वा वेतन आयोग लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती थकबाकी मिळेल?

SCROLL FOR NEXT