चंद्रपूरमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली
पालकांनी हॉस्टेल स्टाफवर मानसिक त्रासाचा गंभीर आरोप केला आहे
रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
या घटनेमुळे कोचिंग आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत
चंद्रपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय तरुणाने कोचिंग क्लासमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने हॉस्टेलचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरात घडली आहे. शहरातील जनता करियर लाँचर नामक खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याने या निवासी संस्थेत प्रवेश घेतला होता. मात्र काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास या लाँच मधील वरच्या मजल्यावर राहत असलेल्या ठिकाणी तरुणाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत मुलाचे वडील गुलाब विठुजी सुदरी यांनी सांगितल्यानुसार, "माझ्या मुलाला तो राहत असलेल्या हॉस्टेलचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत होते. त्याची मनस्थिती बरोबर वाटत नव्हती, परंतु त्याला आम्ही समजावून सांगितलं की, तू व्यवस्थित राहा. त्यानंतर आम्ही त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही"
मृत मुलाच्या वडिलांनी हॉस्टेलचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुलाब विठुजी सुदरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लक्ष्मन रमाजी चौधरी, प्रेमा झोटींग, विष्णुदास शरद ठाकरे, आशिष किष्णाजी महातळे, यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक श्री इश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.