15 lakh seized  yandex
क्राईम

Gondia Crime: तिरोडा-गोंदिया मार्गावर १५ लाखांची रोख रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई

Tiroda-Gondia Crime: विधानसभा निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुद्धा वाहनांची तपासणी मोहीम राबविली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिरोडा-गोंदिया मार्गावर निवडणूक भरारी पथकाने कॅशची वाहतूक करणाऱ्या वाहनातून १५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. अदानी विद्युत प्रकल्पाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुद्धा वाहनांची तपासणी मोहीम राबविली जात आहे.

दरम्यान तिरोडा-गोंदिया मार्गावरील अदानी विद्युत प्रकल्पाजवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने कॅश वाहतूक करणारे टाटा झेनॉन पिकअप वाहन क्रमांक ६३०२ या वाहनाला थांबवले. या वाहनाला केवळ गोंदियात कॅश सोडण्याची परवानगी होती. पण, ते तिरोडा येथे जात होते. वाहनाची तपासणी केली असता त्यात १५ लाख रुपयांची रोकड आढळली. याची माहिती निवडणूक विभागाच्या तिरोडा येथील भरारी पथक क्रमांक २ यांना दिली. त्यांनतर वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयात जमा केली. याप्रकरणी तिरोडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील एका रो-हाऊसमध्ये बिल्डरच्या घरात दोन कोटी साठ लाखांची रोकड सापडली. नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीने खबर दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदर्श सुनिश्चित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. यावेळी तपासात सापडलेली एकूण २ कोटी ६० लाखांची रोख रक्कम मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोणी व कोणत्या उद्देशाने घरात ठेवली होती, याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

Written By: Dhanshri Shintre.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT