बंगळुरुमधील एका खासगी शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने जणू सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितेनुसार, शुक्रवारी ०८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या होली क्राइस्ट इंग्लिश स्कूलमध्ये काही विद्यार्थी मस्ती करतह होते ते विद्यार्थी एकमेकांवर पाणी उडवत होते. या मस्ती दरम्यान, काही पाण्याचे त्यांच्या एका शिक्षकावर उडाले. पाणी उडाल्यामुळे संतापलेल्या शिक्षकाने मुलाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्या मुलाचा दात तुटला.
या प्रकरणाची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली. पोलीस अधिकारी त्या शाळेत जाऊन शिक्षकेविरुद्ध एफआयआर नोंदवला. एफआयआरनुसार समजले की अजमथ असे शिक्षकाचे नाव आहे. यानंतर याच शिक्षकाने शुक्रवारी दुपारी पोलिसांत जाऊन मुलाच्या पालंकाविरुद्ध तक्रार नोंदवायची आहे असे सांगितले. काही काळापूर्वी त्यांच्यात फी वरुन वाद झाला होता असे त्यांनी सांगितले.
मीडियाशी बोलताना, विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, गेल्याही वर्षी याच शाळेतील आणखी एका शिक्षकाने अशाच एका ६ वर्षाच्या मुलीलाही मारहाण केली होती, त्यामुळे तिचा हात आठवडाभर सुजला होता. त्यांनी हे शाळा प्रशासनाला प्रश्न विचारले त्यांनी माफी मागितली आणि माफीनामा पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे अजमथवर बाल न्याय कायदा आणि बीएनएस कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शाळेत नेमकं काय घडलं जाणून घ्या...
विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आणि वर्गमित्र डिंकाच्या बाटल्यांमध्ये भरलेले पाणी घेऊन खेळत होते. यावेळी नेमकं तिथे शिक्षक आल्याने चुकून त्यांच्यावर पाण्याचे काही थेंब उडाले. या घटनेने शिक्षक संतापून रागाच्या भरात त्याने आधी विद्यार्थ्यांना काठीने इशारा केला, पण शेवटी मुलावर काठीने मारहाण केली. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने त्याच्या वर्गमित्रांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांशी संपर्क साधला होता. त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी, शिक्षकाने कथितपणे मुलाला छडीने मारले आणि त्याचा दात तुटला. वडिलांनी असा आरोप केला की शाळा प्रशासनाने हे प्रकरण खाजगीरित्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस तक्रार दाखल करू नये म्हणून मन वळवले. शाळा प्रशासनाने हे आरोप नाकारले आहेत. शिक्षिकेने मुलाला मारलं नाही. तिथे फक्त लाकडाची पट्टी हातात घेतली. शिक्षिका मारतील म्हणून मुलगा पळून जात होता. तेव्हा तो एका टेबलला धडकला आणि खाली पडला. यातच मुलाचा दात तुटल्याचं म्हटलं आहे.
Written By: Dhanshri Shintre.