सध्या लोक दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहतात. त्यामुळे त्यांना घरच्यांशी संवाद साधता येत नाही. अशावेळेस लोक व्हिडीओ कॉल हा पर्याय निवडतात. काहीजण महत्वाच्या कामांसाठी किंवा ज्यांना एखाद्या व्यक्तीला भेटता येत नसेल ते लोक झुम व्हिडीओ कॉलचा वापर करतात. याने अनेक कामं प्रवास आणि संवाद खूप सोपा होतो. पण तुम्हाला माहितीये का? की ऑनलाइन व्हिडीओ कॉल्समुळे तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात हॅक होण्याची शक्यता असते.
तुम्हीही जर कामाच्या ठिकाणी Zoom मिटींग्सचा वापर करत असाल तर पुढील बातमी नक्की वाचा. भारत सरकारने Zoom वापरकर्त्यांना भविष्यात धोका निर्माण होईल असा सुरक्षेचा इशारा जारी केला आहे. वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे Zoom सारख्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सवर हॅकर्सकडून गंभीर धोके निर्माण झाले आहेत. यामुळे वैयक्तिक माहिती, संवेदनशील डेटा आणि व्यावसायिक संवाद धोक्यात येऊ शकतात.
Indian Computer Emergency Response Team (CERT-In) कडून हा इशारा देण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी Zoom मधील एक गंभीर Vulnerability समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. CERT-In च्या माहितीनुसार, या चुकीचा फायदा घेत हॅकर्स लांबूनच एखाद्या डिव्हाइसवर घातक कमांड्स पाठवू शकतात.
एकदा डिव्हाइसवर नियंत्रण मिळालं, तर हॅकर त्या डिव्हाइसचा पूर्ण ताबा घेऊ शकतो, जणू तोच मूळ युजर असल्यासारखा. आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक सॉफ्टवेअर त्रुटींपैकी एक मानली जात आहे. या त्रुटीला CVE-2026-22844 असं नाव देण्यात आलं आहे. नेटवर्कद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झालेला एखादा व्यक्ती या त्रुटीचा वापर करून सर्व्हरवर घातक आदेश चालवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
ही समस्या Zoom च्या Node Multimedia Router (MMR) मध्ये आढळली. त्यामुळे हा घटक मोठ्या आणि हायब्रिड मीटिंग्समध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ व्यवस्थापनासाठी वापरला जातो. CERT-In च्या म्हणण्यानुसार, Zoom Node Meetings, Hybrid Meetings आणि Zoom Node Meeting Connector हे मॉड्यूल्स जर 5.2.1716.0 पेक्षा जुन्या व्हर्जनवर चालत असतील, तर ते या हल्ल्यासाठी असुरक्षित आहेत. त्यामुळे सध्या zoom चा वापर थांबवणं सोयीस्कर राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.