झोहो हे भारतात विकसित झालेलं स्वदेशी सॉफ्टवेअर आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झोहो वापरण्याचं आवाहन केलं.
सरकार तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे.
सरकारने तंत्रज्ञानात स्वावलंबनावर भर देण्यास सुरुवात केली आहे. सरकार सेमीकंडक्टर आणि चिप्सपासून ते स्वदेशी सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचच एक भाग म्हणून भारताने झोहो हे टूल आणलंय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झोहोचा वापर करण्याचे आणि त्यावर स्विच करण्याचे आवाहन केलं.
अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील ट्विटमध्ये झोहोबद्दल माहिती दिली. झोहो लॉन्च झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलची धकधक वाढलीय. कारण झोहो थेट या दोन्ही सर्च इंजिनला टक्कर आहे. आता तुम्ही म्हणाल, केंद्रिय मंत्र्यांनी माहिती, त्यांनी ते वापरण्याचे आवाहन केलं. गुगलला टक्कर देणार हे सर्व खरंय, पण हे झोहो नेमकं काय आहे बुवा? साहजिकच हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
या प्रश्नांच्या उत्तरासह झोहोचं नेमका या काय उपयोग होणार हे जाणून घेऊ. दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झोहो वापरण्याबद्दल आणि त्यावर स्विच करण्याबाबत आवाहन केलं. इतकेच नाही तर आपणही मी झोहो वापरणार असल्याचं संगितलं, त्यांनी याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करून दिली.
झोहोची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की,डॉक्युमेंट अॅक्सेस, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशनसाठी ते स्वदेशी प्लॅटफॉर्म झोहोकडे वळत आहे. सध्या बहुतेक लोक या सर्व कामांसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनात सामील व्हा. स्वदेशी उत्पादने आणि सेवांचा अवलंब करा असं मी सर्वांना आवाहन करतो. झोहो हे एक लोकप्रिय साधन आहे, परंतु त्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. लोकांचे काम सोपे करण्यासाठी गुगल देखील अशीच साधने देत आहे.
झोहो कॉर्पोरेशनची स्थापना १९९६ मध्ये श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी केली होती. ही चेन्नई येथे स्थित एक सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस (SaaS) कंपनी आहे. चेन्नई येथे मुख्यालय आहे. कंपनी ५५ हून अधिक क्लाउड-आधारित साधने ऑफर करते जी व्यवसाय, ईमेल अकाउंटिंग, एचआर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सीआरएम आणि बरेच काहीसाठी वापरली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी अमेरिकेत स्थापन झाली आहे पण तरीही या कंपनीची ओळख मेड इन इंडिया अशीच आहे. ही कंपनी प्रामुख्याने तामिळनाडूच्या ग्रामीण भागातून काम करते. जगभरात तिचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत आणि तिच्या सेवा १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झोहो टूल्स नावाने अनेक उत्पादकता साधने ऑफर करते. हे टूल्स Zoho Workplace, Zoho Office Suite च्या अंतर्गत येत असतात. Zoho Writer, Sheet, Notebook, Work Drive, Mail, Meeting आणि कॅलेंडर हे कंपनीच्या लोकप्रिय अॅप्लिकेशनपैकी एक आहे, जे लोक मोठ्या प्रमाणात वापरत असतात.
झोहो त्याचे काही अॅप्स मोफत देते, ज्यामध्ये तीन वापरकर्त्यांसाठी झोहो सीआरएमची मोफत कायमची आवृत्ती समाविष्ट आहे. तर उर्वरित अॅप्सना सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. परंतु त्यांच्या पेड प्लॅनसह, झोहो हा त्यांच्या स्पर्धकांमध्ये एक परवडणारा आणि चांगला पर्याय आहे, ज्यामुळे तो लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी एक उत्तम पर्याय बनतो.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित केले. हे भाषण जीएसटी सुधारणा लागू होण्याच्या एक दिवस आधी दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर जनतेला होणारे फायदे सांगितले. पंतप्रधान मोदींनी त्याला "जीएसटी बचत महोत्सव" असे संबोधले. पंतप्रधान मोदींनी सर्वांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले आणि सर्व राज्यांना विशेष आवाहन केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.