Business Idea saam tv
बिझनेस

Business Idea: कोणतीही गुंतवणूक न करताही तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिन्याला कराल मोठी कमाई

Surabhi Jagdish

नोकरीपेक्षा आपण एखादा बिझनेस करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आर्थिक पाठबळ महत्त्वाचं असल्याने अनेकजण या इच्छेला सत्यात उतरवत नाही. जर तुम्हीही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि कमी पैशांमध्ये तुम्हाला बिझनेस सुरु करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करून मोठे पैसे कमवायचे आहेत तर तुम्ही या व्यवसायाकडे वळू शकता. आजकालची तरुणाई मोठ्या कॉलेजमध्ये शिकून व्यवसायाकडे वळतायत. इतकंच नाही तर या बिझनेसमधून ते मोठी कमाई देखील करतायत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेसची माहिती देणार आहोत.

तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही घरी बसून पॅकेजिंग व्यवसाय सुरू करू शकता. हे असं काम आहे जे घरातील महिलाही घरात बसून सहजरित्या करू शकतात. सध्या रोजच्या वापरात वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सच्या पॅकेजिंगची मागणी वाढलीये. ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे पॅकेजिंगच्या बिझनेसला गती मिळालीये.

फूड, ड्रिंक्स यांच्या प्रोडक्ट्सच्या डिलीवरीसाठी खास पॅकेजिंग आवश्यक असते. तुम्ही तुमच्या घरातून पॅकिंगचा हा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी खर्चात सुरू करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही या बिझनेसच्या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवू शकता.

प्रत्येक ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या गोष्टींचं पॅकेजिंग उत्तम लागतं. यासाठीच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये खूप पैसा खर्च करतात. पॅकिंगचं काम दोन प्रकारे सुरू करता येऊ शकतं. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही थेट कंपनीशी संपर्क साधून त्यांचे प्रोडक्ट्स पॅक करण्याचं काम करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या होलसेलर विक्रेत्याकडून किंवा रिटेलर विक्रेत्याकडून पॅकिंगचं काम घेऊ शकता.

कंपनीकडून पॅकिंगचे काम घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती कंपनीच तुम्हाला पॅकिंगचं सर्व साहित्य पुरवतं. त्यामुळे या काळात तुम्हाला फक्त प्रोडक्ट पॅक करावं लागणार असून ते कंपनीला वेळेवर परत पाठवावं लागेल. त्यामुळे यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणूकीची गरज लागणार नाहीये.

कंपनीकडून काम मिळवण्यासाठी तुम्ही मालकाकडे किंवा मॅनेजमेंटकडे जाऊन बोलू शकता. जर तुमच्या जवळ कोणतीही कंपनी नसेल तर आजकाल इंटरनेटवर अशा कंपन्या आहेत ज्या घरी बसून लोकांना ऑनलाइन पॅकिंगचे काम देतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हे काम ऑनलाइनही मिळू शकणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यांना अधिक पॅकिंगची आवश्यक भासते.

किती नफा तुम्हाला मिळू शकतो

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही स्वतःच हाताने पॅकिंगचं काम सुरू करू शकता. त्यानंतर जसे तुम्हाला पैसे मिळतील तसं तुम्ही पॅकिंग मशीन देखील खरेदी करू शकता. तुम्ही हा व्यवसाय 5000-6,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही दरमहा 20,000-25,000 रुपये सहज कमवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

SCROLL FOR NEXT