Yamaha RX 100 Saam Tv
बिझनेस

Yamaha RX 100 ची १९८५ मध्ये किंमत किती होती? आकडा पाहून व्हाल चकीत

Yamaha RX 100 Price: Yamaha RX 100 या बाईकची क्रेझ अजूनही संपली नाही. या बाईकचे नाव जरी काढले तरी अनेक जण जुन्या आठवणी सांगतात. ही बाईक १९८५ मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यावेळी त्याची किंमत किती होती घ्या जाणून...

Priya More

Yamaha RX 100 या बाईकची क्रेझ आजही पाहायला मिळत आहे. कंपनीने ही बाईक १९८५ मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. भारतीय बाजारात ही बाईक खूपच प्रसिद्ध होती पण १९९६ मध्ये कंपनीने या बाईकचे उत्पादन थांबवलं. त्या काळामध्ये तरुणाईंमध्ये या बाईकची इतकी क्रेझ होती की ही बाईक चालवणाऱ्यांकडे सर्वजण उत्सुकतेने पाहत राहायचे. १९८५ मध्ये जेव्हा ही बाईक लाँच झाली तेव्हा त्यांची किंमत फक्त १६,००० रुपये इतकी होती. आता या कंपनीची जी बाईक लाँच होण्याची शक्यता आहे त्याची किंमत दीड लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

बाईकवाला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Yamaha RX 100 या बाईकची १९८५ ते १९९६ या काळामध्ये किंमत १६,००० रुपये होती. त्याकाळात Yamaha कंपनीच्या बाईकला सर्वात जास्त पसंती मिळत होती. Yamaha कंपनीची ही बाईक आता कंपनीकडून विकली जात नसली तरी देखील या बाईकच्या बऱ्याच आठवणी अनेक जण सांगतात आणि कौतुकही करतात. Yamaha RX 100 या बाईकची खासियतच खूप चांगली होती. ही बाईक लाँच होऊन मार्केटमध्ये आल्यानंतर ग्राहक आणि चाहत्यांचा एक नवीन वर्ग तयार केला होता.

महत्वाचे म्हणजे, Yamaha RX 100 या बाईकची त्या काळात इतकी क्रेझ होती की बॉलिवूड चित्रपटामध्ये या बाईकचा वापर खूप प्रमाणात झाला. त्यावेळी स्क्रिनवर कोणतीही बाईक असली तरी बॅकग्राऊंडला येणारा आवाज Yamaha RX 100 या बाईकचा असायचा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये RX 100 नावाचा चित्रपट तयार करण्यात आला होता.

हलक्या वजनाच्या आणि अष्टपैलू बाईक म्हणून Yamaha RX 100 ने खूप लक्ष वेधले. या बाईकमध्ये कंपनीने फक्त ९८ सीसी क्षमतेचे टू-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन वापरले होते. ज्याने ११ बीएचपी पॉवर आणि १०.३९ एनएम टॉर्क जनरेट केला. हे इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले होते. ही १०३ किलोची बाईक तेव्हा १०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावायची. पिक-अपच्या बाबतीत त्या काळात या बाईकची दुसऱ्या बाईकशी तुलना करता येत नव्हती.

दरम्यान, Yamaha RX 100 या बाईकची क्रेझ असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच कंपनी Yamaha RX 100 ही बाईक पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाईक भारतामध्ये जानेवारी २०२७ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या बाईकची तेव्हा अंदाजे किंमत १,४०,००० ते १,५०,००० पर्यंत असण्याची शक्यता आहे. म्हणजे, १९८५ मध्ये फक्त १६,००० रुपयांमध्ये मिळणारी ही बाईक आता दीड लाखांमध्ये खरेदी करावी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT