Yamaha launches first electric scooter in India Yamaha EC-06 with 169 km range saam tv
बिझनेस

Electric Scooter: तब्बल 169KMची रेंज; शानदार Yamaha EC-06 स्कूटर लॉन्च,जाणून घ्या प्रीमियम फीचर्स

Yamaha EC-06 Launched: यामाहाने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, EC-06 लाँन्च केली आहे. १६९ किलोमीटरची रेंज, शक्तिशाली मोटर आणि प्रीमियम डिझाइनसह, ही स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • Yamaha ने भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 लॉन्च केली आहे.

  • एका चार्जमध्ये 169 किमीपर्यंत रेंज देण्याची क्षमता स्कूटरमध्ये आहे.

  • प्रीमियम डिझाइन आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर.

यामाहाने अखेर भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, यामाहा EC-06 लाँन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 1,67,600 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आलीय. ही स्कूटर शहरांमध्ये दैनंदिन वापर लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. सुरुवातीला यामाहाच्या प्रीमियम ब्लू स्क्वेअर डीलरशिपद्वारे निवडक शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Yamaha EC-06 बॅटरी आणि रेंज

Yamaha EC-06 मध्ये ची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे, जी Interior Permanent Magnet Synchronous Motor (IPMSM) सोबत जोडली गेली आहे. हे सेटअप 6.7kW पीक पॉवर आणि 26Nmटॉर्क जनरेट करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी/तास आहे. या स्कूटरला घरातल्या प्लगने सुद्धा चार्ज करता येऊ शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे ८ तास लागतात. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर स्कूटर 169 किमी पर्यंतची रेंज देते. ही रेंज शहरातील दैनंदिन प्रवासासाठी पुरेशी ठरते.

यामाहा EC-06 एकाच निळ्या पांढऱ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध असेल. ही स्कूटर भारतात डिझाइन केली गेली आहे. पण स्कूटरचा लूक आणि फील ग्लोबल मानकांनुसार ठेवण्यात आलाय. ही स्कूटर शहरी ग्राहकांसाठी उत्तम आहे. स्टाइल, पर्यावरणपूरक लूक हवा त्यांच्यासाठी हा स्कूटर उत्तम पर्याय हवा आहे.

EC-06 मध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंना २०० मिमी डिस्क ब्रेक आहेत. तसेच चांगल्या आणि सुरक्षित ब्रेकिंगसाठी कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) आहे. स्कूटरमध्ये LED हेडलाइट आणि टेललाइट देखील आहे, जे रेडिएंट आणि रिफ्लेक्टिव्ह दोन्ही आहेत. जे कमी प्रकाशात चांगली दृश्यमानता देण्यासह एक आधुनिक लूक देखील देतात.

यामाहा EC-06 मध्ये तीन रायडिंग मोड्स आहेत: इको, स्टँडर्ड आणि पॉवर. इको मोडमध्ये चांगली रेंज मिळते. स्टँडर्ड मोड संतुलित कामगिरी देतो, तर पॉवर मोड जलद प्रवेग प्रदान करतो. अरुंद जागांमध्ये सहज हालचाली करण्यासाठी रिव्हर्स मोड देखील उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT