Youngest Billionaire Saam tv
बिझनेस

Youngest Billionaire: भारतीय वंशाच्या आदर्श आणि सूर्याची गगनभरारी, अवघ्या २२ व्या वर्षी बनले अब्जाधीश; मोडला मार्क झुकरबर्ग यांचा रेकॉर्ड

Aadarsh Hiremath and Surya Midha Youngest Billionare: भारतीय वंशाच्या दोन तरुणांनी अमेरिकेत स्टार्टअप सुरु केला. त्यांच्या कंपनीची वॅल्यू खूप जास्त आहे. ते वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अब्जाधीश झाले आहेत.

Siddhi Hande

आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा, ब्रेंडन फूडी बनवे सर्वात तरुण अब्जाधीश

मोडला मार्क झुकरबर्गचा रेकॉर्ड

आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा भारतीय वंशाचे

अवघ्या २२ व्या वर्षी तीन तरुण हे अब्जाधीश बनले आहेत. त्यांनी मार्क झुकरबर्ग यांचाही विक्रम मोडला आहे. अमेरिकन एआय कंपनी मर्कोरते तीन संस्थापक हे सेफ मेड अब्जाधीश बनले आहे. या तिघांनी अवघ्या २२ व्या वर्षी खूप मोठी कामगिरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या तिघांपैकी दोघेजण हे भारतीय आहेत. आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा, ब्रेंडन फूडी अशी या तिघांची नावे आहेत.

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश

भारतीय आणि अमेरिकन वंशाच्या २२ वर्षीय तरुणांनी चांगली कामगिरी केली आहे. या तिघांनी मिळून २००८साली वयाच्या २३ वर्षी अब्जाधीश होणाऱ्या मार्क झुकरबर्गची जागा घेतली आहे. या तिघांपैकी आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा हे भारतीय रहिवासी आहेत.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, या तिघांनी सॅन फ्रान्सिस्को येथे स्टार्टअप सुरु केले. या स्टार्टअपने $350 दशलक्ष निधी उभारला आहे. या कंपनीची वॅल्यू $10 अब्जापर्यंत वाढली आहे. यामुळेच एआय कंपनीचे सीईओ ब्रेंडन फूडी, सीटीओ आदर्श हिरेमठ आणि बोर्ड अध्यक्ष सुर्या मिधा जगातील सेल्फ मेड अब्जाधिश ठरले आहेत.

या तिन्ही मित्रांची वैयक्तिक संपत्ती अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हे तिघेही मित्र कॉलिफोर्नियात एकाच शाळेत शिकले. आदर्श हिरमेठ आणि सूर्या मिधा यांनी वादविवाद संघातदेखील कामगिरी केली. त्यांनी एकाच वर्षी अमेरिकेतली तिन्ही राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा जिंकल्या. नंतर ते ब्रेंडन फूडीला भेटले. तेव्हा या तिघांनीही स्टार्टअप सुरु करण्याचे ठरवले. त्यांना पीटर थिएलकडून फेलोशिप मिळाली. त्यांनी स्टार्टअप सुरु करण्यासाठी $100,000 दिले. यानंतर त्यांनी मर्कोरची स्थापना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

कोणत्या भाजीत मोहरी घालू नये

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

Kshitish Date : मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाटक; क्षितिज दाते मुख्य भूमिकेत, कुठे अन् कधी पाहता येणार?

SCROLL FOR NEXT