iPhone 13 Price Down  Saam Tv
बिझनेस

World Most Expensive iphone : कसा आहे आयफोनचा सर्वात महाग मोबाईल? किंमत एवढी की मुंबईत अलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट येईल

iPhone 14 Pro Max ची किंमत सुमारे 1,39,000 रुपये आहे.

साम टिव्ही ब्युरो

iphone News : सर्वात महाग  स्मार्टफोन कोणता? असं विचारलं तर तुमच्या तोंडून लगेत iPhone हे नाव निघेल. आयफोनचा सर्वात महाग मोबाईलiPhone 14 Pro Max ची किंमत सुमारे 1,39,000 रुपये आहे. मात्र आयफोनचा हा मोबाईल सर्वात महाग नाही. सर्वात महाग मोबाईल आयफोनचाच आहे, पण तो जवळपास 5 कोटींचा आहे.

आयफोनच्या ज्या मॉडेलबद्दल आम्ही बोलत आहोत ते मॉडिफाईड मॉडेल आहे. iPhone 14 Pro Maxचं हे मॉडेल ब्रिटीश ज्वेलरी ब्रँड ग्राफच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे. आयफोनचे हे स्पेशल मॉडेल लॅम्बोर्गिनी कारपेक्षा महाग आहे, ज्या कारची किंमत भारतात सुमारे 3.5 कोटी रुपये आहे.

सोनं, हिरेजडीत मोबाईल

iPhone 14 Pro Max च्या या मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बॅक पॅनलवरील पेडंट. या पेडंटची किंमत 62 लाखांहून अधिक आहे. या पेडेंटमध्ये 570 हिऱ्यांचा साज आहे. हे पेडेंट प्लॅटिनम तसेच सफेद सोन्यापासून बनवलेले आहे.

कसा विकत घेणार?

जर तुम्हाला iPhone 14 Pro Max चे हे मॉडेल विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला Caviar च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑर्डर द्यावी लागेल. हा फोन अॅपल स्टोअर, ई-कॉमर्स वेबसाइट किंवा Apple च्या वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकत नाही. (Latest Marathi News)

Apple ने गेल्या वर्षी iPhone 14 Pro Max लाँच केला होता. यामध्ये यूजर्सना 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेची ब्राइटनेस 2000 nits आहे. ज्यामुळे तुम्ही सूर्यप्रकाशातही तो वापरू शकता. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत, ज्यामध्ये एक अल्ट्रा वाइड आणि दुसरा टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी 12-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT