Free Driving License Saam Tv
बिझनेस

Free Driving License: महिलांना मिळणार मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ;'या' राज्याने घेतला महत्त्वाचा निर्णय

Women Will Get Free Driving License: भारतातील या राज्यात महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे राज्य कोणते ते जाणून घ्या.

Siddhi Hande

भारतात देशात जवळपास प्रत्येक घरात एकतरी वाहन हे आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.वाहन चालवताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील सिग्नलचे पालन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पीयूसी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. लायसन्स नसतानाही वाहन चालवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे लायसन्स हे असायला हवे. आता तर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस अगदी सिंपल झाली आहे. (Free Driving License)

ड्रायव्हिंग लायसन्स नसूनही वाहन चालवले तर वाहतूक पोलिस कारवाई करतात. वाहनचालकाला दंड भरावा लागतो.सध्या लायसन्स काढणे सोपे झाले आहे. वाहनधारक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेदेखील लायसन्स काढू शकतात. यासाठी काही शुल्क भरावे लागते. मात्र, भारतात एक राज्य असं आहे जिथे महिलांना लायसन्स काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.

मध्यप्रदेशमध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. १८ वर्षांवरील प्रत्येक महिला मोफत ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकते. मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढणे अत्यंत सोपे आणि सिंपल झाले आहे. एमपी परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल ७,५२,६०० पेक्षा जास्त महिलांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सिंपल प्रोसेस (Driving License Application Process)

तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतात. ऑफलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन लायसन्स देण्यात येईल.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची ऑनलाइन प्रोसेस (Online Driving License Application Process)

तुम्हाला सर्वप्रथम www.sarathi.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करावे लागेल.यानंतर तुम्ही तुमची माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी वेळ दिली जाईल. त्यावेळी तुम्हाला कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT