GST Council 57th Meeting on September meta ai
बिझनेस

GST Council : मोबाइल स्वस्त होणार का? GST बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

GST Council 57th Meeting on September 12: GST कौन्सिलच्या ५७व्या बैठकीत मोबाइल आणि स्मार्टफोनवरील GST दराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. करकपात झाल्यास मोबाइलच्या किमती कमी होऊन ग्राहकांना थेट फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातले व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे लक्ष आता GST Council च्या ५७ व्या बैठकीकडे लागलं आहे. ही बैठक १२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बैठकीचे अध्यक्षपद भूषणवणार आहे. त्याआधी ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्याआधी ११ सप्टेंबरला जीएसटी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या GST Council च्या ५६ व्या बैठकीत जीएसटी दर आणि टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. चार टॅक्स स्लॅब कमी करून दोन महत्त्वाचे स्लॅब ठेवण्यात आले. तसेच लाईफ इन्शुरन्सवरील जीएसटी माफ करण्यात आली होती. भारतीय ब्रेडवरील जीएसटी शून्य करण्यात आली, तसेच आरोग्य विम्यावरच्या जीएसटीमध्येही मोठी सवलत देण्यात आली होती.

त्यामुळे यंदाच्या बैठकीत पुन्हा जीएसटी दरात कपात होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र आगामी बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर झालेला नाही. मागील वर्षी करण्यात आलेल्या करकपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत कितपत पोहोचला, याचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. ग्राहकांना अपेक्षित फायदा मिळाल्यास काही क्षेत्रांमध्ये आणखी सवलतींचा विचार होऊ शकतो.

याशिवाय स्मार्टफोन आणि मोबाइलवरील जीएसटी, जीएसटी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि कर प्रशासन अधिक पारदर्शक करण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. Grant Thornton India चे पार्टनर मनोज मिश्रा यांच्या मते, जीएसटीचे नियम अधिक स्पष्ट करण्यासोबतच टॅक्स प्रशासन सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर दिला जाऊ शकतो.

दरम्यान, जीएसटी कलेक्शनमध्येही वाढ झाली आहे. जुलै २०२५ मध्ये ₹१.८३ लाख कोटी, तर जुलै २०२६ मध्ये ₹२.११ लाख कोटी जीएसटी जमा झाला. म्हणजेच वर्षभरात १५.४ टक्क्यांची वाढ झाली. जुलै २०२६ मध्ये ₹२९,९६८ कोटींचे GST रिफंड करण्यात आले असून त्यात १३.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. आता ५७व्या बैठकीत कोणते निर्णय होतात आणि त्याचा थेट फायदा ग्राहक व व्यवसायांना किती मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning sneezing: सकाळी उठल्यावर अचानक शिंका येतायत? या 3 गंभीर समस्या असू शकतात

Maharashtra News Live Update: चांदोली-वारणा धरण 100 टक्के भरलं, सांगली-कोल्हापूरची पाण्याची चिंता मिटली

Refined oil alternatives: रिफाइंड तेल धोकादायक! हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे 5 प्रकारचे तेल

High Blood Pressure : हाय बीपी काही मिनिटांत होईल कमी, फक्त करा 'हे' छोटं काम

आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या १५ ज्येष्ठांच्या पायी नतमस्तक! कामशेतमध्ये रंगला भक्तीमय सोहळा

SCROLL FOR NEXT