Who is Ravi Ruia Saam Tv
बिझनेस

Who is Ravi Ruia: भारतातील माणसाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, किंमत जाणून व्हाल थक्क; कोण आहे 'ही' व्यक्ती? जाणून घ्या...

Who Is The Richest Indian in London: भारतातील माणसाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, किंमत जाणून व्हाल थक्क; कोण आहे 'ही' व्यक्ती? जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

Who is Ravi Ruia: ब्रिटनची राजधानी लंडन हे भारतीय अब्जाधीशांचे आवडते शहर आहे. स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल ते वेदांताचे अनिल अग्रवाल यांसारख्या अब्जाधीशांची लंडनमध्ये घरे आहेत. याच यादीत आता भारतीय उद्योगपती आणि एस्सार ग्रुपचे (Essar Group) सह-संस्थापक रवी रुईया यांचे नाव जोडले गेले आहे.

रुईयाच्या फॅमिली ऑफिसने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ सुमारे 1200 कोटी रुपयांना (11.3 कोटी युरो) एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. हा करार गेल्या काही वर्षांतील लंडनमधील सर्वात मोठा मालमत्ता करार ठरला आहे.

हा बंगला रशियन मालमत्ता गुंतवणूकदार आंद्रे गोंचारेन्को यांच्याशी संबंधित आहे. रुईया यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे नाव हॅनोवर लॉज आहे. हे घर लंडनमधील 150 पार्क रोड येथे आहे. याच्या समोरच रीजेंट पार्क आहे.  (Latest Marathi News)

लंडनमध्ये लक्झरी घरांचे सौदे सहसा कर्जाशिवाय केले जातात

लंडनमधील महागड्या घरांचे सौदे सहसा अशा खरेदीदारांकडून केले जातात, ज्यांना सहसा यासाठी कर्ज घेण्याची आवश्यकता नसते. ब्रोकरेज फर्म नाइट फ्रँकच्या मते, जगभरातील 3 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या 17 टक्के लोकांनी गेल्या वर्षी किमान एक घर खरेदी केले.

कोण आहेत रवि रुईया?

रवी रुईया एस्सार समूहाचे सह-संस्थापक आहेत. एप्रिल 1949 मध्ये जन्मलेने रवी मेकॅनिकल इंजिनीअर आहे. त्यांनी चेन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवी घेतली आहे. रवी यांनी आपल्या करिअरची सुरुवात कौटुंबिक व्यवसायातून केली आणि त्याचा मोठा भाऊ शशी रुईया यांच्यासोबत कंपनीला नवीन उंचीवर नेले.

दोन्ही भावांनी संयुक्तपणे एस्सार ग्लोबल फंड लिमिटेडची (EGFL) स्थापना केली. त्याचे व्यवस्थापन एस्सार कॅपिटल लिमिटेड करते. 20 हून अधिक देशांमध्ये पसरलेला एस्सार समूह पोलाद, तेल आणि वायू, ऊर्जा, दळणवळण, शिपिंग, प्रकल्प आणि खनिजे या क्षेत्रात काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT