UPSC Topper Saam Tv
बिझनेस

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

UPSC Topper Anuj Agnihotri Success Story: देशातील यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यूपीएससी परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी पहिली रँक प्राप्त केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Siddhi Hande

काल देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तब्बल ९५८ उमेदवार आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकार झाले आहे. यूपीएससी परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी पहिली रँक मिळवली आहे. २६ व्या वर्षी त्याने यूपीएससी परीक्षेत पहिली रँक मिळवून कुटुंबाचे नाव मोठे केले आहे.

अनुज मूळचs राजस्थानच्या रावतभाटा येथील रहिवासी आहे. चंबल नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या या गावचे ते रहिवासी आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या मुलाने आज यशाचे शिखर गाठले आहे. त्याचे वडील टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे.

अनुजने खूप वर्ष मेहनत केली. यावेळी तिसऱ्या प्रयत्नात त्याने पहिली रँक प्राप्त केली. पहिल्या प्रयत्नात त्यांची निवड DANICS (दिल्ली, अंडमान आणि निकोबार द्वीप समूह सिविल सेवा)साठी झाली होती. यासाठी ते दिल्लीमध्ये ट्रेनिंगदेखील करत होते. परंतु त्यांनी या यशाला मागे टाकत पुन्हा एकदा प्रयत्न केले.

अनुजने सुरुवातीचे शिक्षण रावतभाटा येथून केले. १०वीनंतर ते कोटा येथे गेले. २०१५ ते २०१७ हा कालावधी त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. २०१७ मध्ये त्याने एम्स आणि नीट यूजीमध्ये चांगली रँक मिळवली. एम्स जोधपूरमधून एमबीबीएस डिग्री प्राप्त केली. २०२३ मध्ये इंटर्नशिप संपल्यानंतर यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

अनुज अग्निहोत्री यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली. ऑनलाणइन अभ्यास करुन यूपीएससी परीक्षा पास केली. एमबीबीएस करुन त्यांनी यूपीएससी परीक्षेचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसला अज्ञात वाहनाची धडक; १६ जण गंभीर जखमी

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू ; पुतण्यासह तीन जण जखमी, राजकीय वर्तुळात शोककळा

Accident News : महामार्गावर भयंकर अपघात! उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT