प्रत्येक आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी पेन्शन सुरु करत असतात. पेन्शनमुळे आपल्याला अनेक वाद देखील पाहायला मिळाले आहे. पण सरकारने पेन्शन बाबत काही नवीन नियम काढले आहेत. अनेकदा आपल्याला पेन्शनच्या नवीन नियमांबद्दल माहित नसते. याबरोबर पेन्शनबाबत योग्य माहिती असणे फार आवश्यक आहे.
सरकारच्या नव्या फॅमिली पेन्शनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मुलींना देखील पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. याबरोबर पेन्शन व्यक्तीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनची पात्रता ठरवण्यात येणार आहे. हे सर्व नियम २०२१ च्या वर्षापासून केद्रींय नागरिक सेवाने सुरु केले आहेत. या नियमांमध्ये कुटुंबातील सावत्र आणि दत्तक मुलींसह अविवाहित,विविहित,अपंग मुलींचा समावेश आहे.
पेन्शनच्या या नवीन नियमांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र कुटुंबातील सदस्यांच्या यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. याबरोबर मुलींना पेन्शनबाबत असलेले सर्व लाभ घेता येणार आहे. नियमांनुसार मुलगी कुटुंबातील सदस्य असते. यामुळे कुटुबांच्या तपशीलात मुलीचे नाव समाविष्ट करण्यात येईल. पेन्शनच्या या नवीन नियमांमुसार मुलगी ही अपंग असताना किंवा लग्न होईपर्यंत किंवा जॅाब लागेपर्यंत पेन्शनसाठी पात्र असेल. पेन्शनच्या या नियमांमध्ये २५ वर्षांवरील अविवाहित, विधवा आणि घटस्फोट मुली कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेऊ शकता. याबरोबर कुटुंबातील सर्व मुलांचे वय २५ असेल, आणि ते काम करत असतील तर घरातील अपंग मुलाचा पहिला हक्क पेन्शवर असेल.
सरकारच्या या नियमांमध्ये प्रत्येक नागरिकाला संपूर्ण कुटुंबाच्या माहितीचा तपशील सरकारकडे सादर करावा लागणार आहे. याबरोर त्या व्यक्तीला निवृत्ती होण्या अगोदर पेन्शनच्या कागदपत्रांसह पुन्हा कुटुंबाची सर्व माहिती द्यावी लागणार आहे.