Fixed Deposit Scheme Saam Tv
बिझनेस

Fixed Deposit Scheme : FD पेक्षा जास्त व्याज मिळवा, पैसेही सुरक्षित राहतील

Investment Tips : गुंतवणूकीदारांना FD पेक्षा जास्त व्याजदार कुठे मिळेल. ज्यात आपल्याला योग्य परताव्यासोबत पैसेही सुरक्षित राहतील.

कोमल दामुद्रे

Higher Interest Rate : पुढच्या भवितव्यासाठी आपण सगळेच कुठे ना कुठे तरी गुंतवणूक करण्याचा विचार करतो. कुणी बँकेत सेव्हिंग करते तर कुणी त्याला गुंतवणूक करते. तर बऱ्यापैकी लोक सोने-चांदी किंवा महागड्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करते.

देशातील अशा अनेक बँका आहेत ज्यांनी अल्प मुदत ठेव योजना सुरु केली आहे. ज्यामध्ये त्या आपल्याला नेहमीच्या मुदत ठेवींच्या तुलनेत कमी वेळेत जास्त व्याजदर देतात. गेल्या वर्षभरात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात लक्षणीय वाढ केल्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटचे व्याज दर शिखरावर पोहोचले आहेत. परंतु, यावर आता कोणताही दर वाढणार नाही असे म्हटले आहे. अशातच गुंतवणूकीदारांना FD पेक्षा जास्त व्याजदार कुठे मिळेल. ज्यात आपल्याला योग्य परताव्यासोबत पैसेही सुरक्षित राहतील. जाणून घेऊया त्याबद्दल

सध्या शेअर बाजारात (Share Market) कमालीची तेजी आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १२ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना मोठा नफा प्राप्त झाला आहे.

मिड कॅप आणि स्मॉलस इंडेक्स हे सध्या १८ टक्क्यांनी वाढले आहेत. बहुतांश कंपन्यांनी जूनमध्येच पहिल्या तिमाहीची आकडेवारी जारी केली आहे. पुढील काही दिवसात बाजारात आणखी तेजी येणार असल्याचे असे म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो. यामध्ये अनेक सरकारी योजनेसोबतच (Scheme) बँकांनी चांगले व्याजदर दिले आहे.

काही खासगी कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी झालेल्या नफ्यातील काही पैसे आपल्याला लाभांशाच्या रुपात देतात. अशा कंपन्यांना डिव्हिडेंट यिल्ड स्टॉक असे म्हटले जाते.

जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काही योजना, खासगी कंपन्या आणि पीएसयूंना किती लाभ होऊ शकतो हे कळेल.

1. योजना

  • पीपीएफ- ७.१ टक्के

  • एसीएसएस- ८.२ टक्के

  • सुकन्या समृद्धी- ८.० टक्के

  • किसान विकास पत्र - ७.५ टक्के

  • एनएससी - ७.७ टक्के

  • मासिक बचत - ७.४ टक्के

  • वार्षिक बचत - ६.८ टक्के

  • पंच वार्षिक बचत -७.५ टक्के

2. खासगी कंपन्यांनी दिलेला परतावा

  • वेदांता - २८.३ टक्के

  • हिंदुस्तान झिंक - २५.७ टक्के

  • सनोफी इंडिया -११.९ टक्के

  • स्वराज इंजिन - १०.४ टक्के

3. पीएसयूंनी किती परतावा दिला?

  • आरईसी- ११.३०%

  • इंडियन ऑइल- १०.९०%

  • कोल इंडिया -१०.३३%

  • स्टील अॅथॉरिटी- १०.२८%

  • एनएमडीसी- ८.६०%

  • पॉवर कॉर्पोरेशन- ८.५०%

  • ओएनजीसी - ८.४५%

  • पीटीसी - ८.४३%

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT