EPFO Update:
एक मोठी बातमी समोर आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर जाहीर केला होता. ईपीएफओने 2023-24 साठीचा व्याजदर गेल्या वर्षीच्या 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के केला आहे.
आता व्याजाच्या संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओकडून व्याजाचे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जाणार आहेत.
अनेक ईपीएफ सदस्यांना 2023-24 या आर्थिक वर्षाचे व्याज कधी मिळेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका ईपीएफ सदस्याच्या प्रश्नाच्या उत्तर देताना ईपीएफने सांगितले की, ''प्रोसेस पाइपलाइनमध्ये आहे आणि व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा केले जातील. कोणाचेही नुकसान होणार नाही.'' दरम्यान, याआधी 2022-23 या आर्थिक वर्षाचे व्याज मार्च 2024 पर्यंत ईपीएफओच्या 28.17 कोटी सदस्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सीबीटीने ईपीएफ सदस्यांच्या पैशावर 8.25 टक्के वार्षिक व्याज देण्याचे सुचवले होते. याधी 8.15 टक्के व्याजदर होता. 10 फेब्रुवारी 2024 च्या पीआयबीच्या माहितीनुसार, बोर्डाने ईपीएफ सदस्यांच्या खात्यांमध्ये अंदाजे 1,07,000 कोटी रुपये व्याज म्हणून देण्याची सूचना केली होती.
सदस्यांचे 13 लाख कोटी रुपये ईपीएफओ खात्यात जमा आहेत. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, ईपीएफओने सदस्यांच्या 11.02 लाख कोटी रुपयांच्या ठेवींवर व्याज म्हणून 91,151.66 कोटी रुपये जारी केले होते. यावेळी जाहीर झालेले व्याज आजपर्यंतचे सर्वाधिक आहे.
उमंग ॲप्लिकेशनवर तुम्ही आता घरबसल्या आपला पीएफ बॅलन्स सहज चेक करू शकता. यासाठी सर्वातआधी उमंग ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. यानंतर मोबाईल क्रमांकाने नोंदणी करा. नंतर ऑप्शनवर जाऊन EPFO निवडा आणि View Passbook वर क्लिक करून UAN OTP वर क्लिक करा. नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तो एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा EPFO पासबुक दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.