भारतात टू व्हीलर सेगमेंटमध्ये होंडाच्या ॲक्टिव्हाची वेगळीच क्रेझ आहे. आता कंपनी लवकरच बाजारात आपली इलेक्ट्रिक Activa सादर करणार आहे. अनेक लोक खूप दिवसांपासून याच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत. आता याचीच लेटेस्ट अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही स्कूटर मार्च 2025 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी येत्या दोन ते तीन आठवड्यांत याची ऑन-रोड ट्रायल सुरू करणार आहे. असं बोललं जात आहे की, कंपनी डिसेंबर 2024 मध्ये ही स्कूटर सादर करू शकते. यानंतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये याची डिलिव्हरी सुरू होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने Honda Activa EV च्या उत्पादनासाठी गुजरात आणि कर्नाटकमध्ये वेगळा सेटअप तयार केला आहे. जेणेकरून याचा प्रतीक्षा कालावधी कमीत कमी ठेवता येईल. कंपनीची भारतातील ही पहिली EV स्कूटर असेल. सध्या कंपनीने याच्या किमतींबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. अंदाजे 1 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत ही ऑफर केली जाऊ शकते.
कंपनी Honda Activa EV मध्ये दोन बॅटरी पॅक देऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, ही स्कूटर वेगवेगळ्या बॅटरी सेटअपवर 100 ते 150 किलोमीटरची रेंज देऊ शकते. स्कूटरमध्ये सिंगल पीस सीट आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात ही स्कूटर चालवणे सोपे होईल. यात 12 इंचाचे व्हिल्स ग्राहकांना मिळेल.
रायडरच्या सुरक्षेसाठी Honda Activa EV मध्ये डिस्क ब्रेक देण्यात येऊ शकतात. ही स्कूटर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शनसह उपलब्ध असेल. स्कूटरमध्ये तरुणांसाठी आकर्षक रंगाचे पर्याय आणि एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर अलॉय व्हील्स आणि साध्या हँडलबारसह येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.