वॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काही अपडेट घेऊन येते. युजर्सना एकमेकांशी संवाद साधताना तो अगदी सुलभ व्हावा यासाठी मेटाने व्हॉट्सअॅपमध्ये आणखी अपडेट वर्जन आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊ.
Webtainfo वर व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरबाबत माहिती देण्यात आली आहे. या नव्या फिचरमध्ये यूजर्सला स्टोअरेजची समस्या राहणार नाहीये. प्रत्येक युजरला आपलं स्टोअरेज मॅनेज करता येणार आहे. त्यामुळे स्टोअरेजबाबतच्या बऱ्याच समस्या दूर होतील.
कोणत्या युजर्सना वापरता येणार नवं फिचर
व्हॉट्सअॅपचं हे नवीन फिचर बीटा टेस्टर्स Android 2.24.6.16 वर्जनसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. Chat Filtering Feature असं या नव्या फिचरचं नाव आहे. या मार्फत स्टोअरेजचा बॅलेन्स करता येणार आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही चॅट लोकेट करू शकता. युजर्सना आपली चॅट शोधण्यासाठी फिल्टरचा वापर करता येणार आहे.
चॅट फिल्टर फिचर काय आहे?
या फिचरमध्ये तीन फिल्टर असणार आहेत. ऑल, अनरीड आणि ग्रुप्स. या मार्फत तुम्ही चॅट लहान मोठी करू शकता. तसेच झटपट एकमेकांना फाइल्स पाठवू शकता. सध्या फक्त बिटा टेस्टरसाठी हे फिचर उपलब्ध आहे. सध्या युजर्संना हे फिचर गुगल किंवा प्ले स्टोअरमधून अपडेट करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. रोजच्या विविध फाइल्स, फोटो, गाणी आणि विविध गोष्टी आपण यावर डाउनलोड करतो. किंवा एक मेकांना शेअर करत असतो. अशावेळी स्टोअरेज फूल होऊन आपल्यालं व्हॉट्सअॅप बंद होतं. व्हॉट्सअॅपमध्ये असेही बरेच ग्रूप असतात ज्यात मोठ्याप्रमाणावर फोटो आणि व्हिडिओ येतात. त्यामुळेच व्हॉट्सअॅप हे नवं अॅप घेऊन येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.