WhatsApp update google
बिझनेस

WhatsApp Spam Calls: WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन कॉल येतायेत? फक्त १ सेंकदात करा ही सेटिंग अन् राहा टेन्शन फ्री

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या अनोळखी कॉल्सपासून त्रास होतोय? ‘Silence Unknown Callers’ सेटिंग ऑन करून स्पॅम कॉल्स थांबवा आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सगळेच डिजीटल माध्यमांचा वापर त्यांच्या महत्वाच्या गोष्टी सेव्ह करण्यासाठी करतात. त्यात Whatsappमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा साठा असतो. कारण बरेचसे महत्वाचे चॅट, PDF, फोटो यामध्ये पीन करुन ठेवता येतात. पण याचा गैरवापर झाला तर? ही एक भीती सगळ्यांच्याच मनात असते.

आता बदलत्या Whatsapp अपडेटमुळे अनोखळी नंबरवरुन कॉल यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये साफबर क्राइम, डेटा चोरी, हॅकर्स किंवा ब्लॅकमेलिंगसारखे लोक फसवू शकतात. जर तुम्हालाही हे फेक कॉल्स येत असतील तर तुम्ही काही सेटिंग्सच्या मदतीने ही समस्या दूर करु शकता. पुढे याच्या सोप्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत.

Whatsapp च्या सायलन्स अननोन कॉलर्स ' (Silence Unknown Callers) या नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही फेक कॉल्सच्या समस्या दूर करु शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचे Whatsapp उघडावे लागेल. मग वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. मग सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा. आता तुम्हाला कॉल्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Silence Unknown Callers हा पर्याय दिसेल. हा तुम्ही ऑन करु शकता. या सोप्या स्टेप्सने तुम्हाला अनोखळी कॉल्स येणार नाहीत.

ही सेटिंग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा चालू करता येते, बंद करता येते. जर तुम्हाला अनोळखी कॉल आला तर तुमची वैयक्तिक माहिती त्यांना देणं टाळा. जास्त वेळ त्यांच्याशी बोलू नका. तसेच त्यांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. तसेच ओटीपी किंवा बॅंकेची माहिती त्यांना अजिबात देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT