Whatsapp Feature Saam Tv
बिझनेस

Whatsapp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर घालणार धुमाकूळ; स्टेटस होणार आणखी मजेशीर, वाचा वैशिष्ट्ये

Whatsapp Status Reshare Feature : व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर लाँच करणार आहे. यामध्ये स्टेट्स री-शेअर करता येणार आहे. हे फीचर इन्स्टाग्रामप्रमाणे काम करणार आहे.

Siddhi Hande

जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करुन लोक एकमेकांना कोणतीही माहिती सहज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅप युजर्सच्या वापरासाठी नेहमी नवनवीन फिचर लाँच करत असतात. व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर लाँच करणार आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस री-शेअर फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

WeBataInfo च्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामवर हे फीचर आधीपासून आहे. त्यानंतर आता हे फीचर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी लाँच करणार आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा स्टेटस म्हणून शेअर करु शकतील.म्हणजेच तुम्ही दुसऱ्याचे फिचर शेअर करु शकणार आहेत.

स्टेटस री-शेअरिंग फिचरची माहिती व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.24.1.6.4 मध्ये उपलब्ध आहे. या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेट्‍स पुन्हा रीशेअर करण्यासाठी शॉर्टकट बटण देण्यात येईल. स्टेटस दोनदा शेअर करता येणार आहे. त्यावर तुम्ही वेगळे कॅप्शनदेखील लिहू शकतात. कॅप्शनमध्ये तुम्हाला इमोजी वापरण्याचा पर्याय दिला जाईल.

सध्या तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेट्‍स री-शेअर करण्यासाठी स्क्रिनशॉट घ्यावा लागतो. त्यानंतर पुन्हा अपलोड करावे लागते. मात्र, आता या नवीन फीचरमुळे तुम्ही स्टेट्‍स डायरेक्ट रीशेअर करु शकणार आहेत. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध असेल. याशिवाय व्हॉट्सअॅप एअर ड्रॉप फीचरवरही काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT