बिझनेस

Whatsapp New Feature: स्टेटस Privacy वाढली! व्हॉट्सअ‍ॅपवर आता तुम्हीच ठरवा कोण करू शकेल तुमचा स्टेटस री-शेअर

WhatsApp Status Privacy: व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड यूजर्ससाठी नवे फीचर टेस्टिंगला आणले आहे. यात स्टेटस अपडेट्सवर अधिक नियंत्रण मिळणार असून, कोण पुन्हा शेअर करू शकेल हे ठरवता येणार आहे.

Dhanshri Shintre

  • व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस रीशेअर कंट्रोलसाठी नवीन बीटा फीचर आणले आहे.

  • यूजर्स “Allow sharing” टॉगल वापरून स्टेटस रीशेअरिंग नियंत्रित करू शकतात.

  • मूळ स्टेटस रीशेअर झाल्यास यूजर्सला नोटिफिकेशन मिळणार आहे.

  • वैयक्तिक माहिती गुप्त ठेवून प्रायव्हसीला अधिक महत्त्व दिले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये सतत यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. आता कंपनीने असे एक फीचर चाचणीसाठी सादर केले आहे जे खासकरून स्टेटस अपडेट्सशी संबंधित आहे. या नवीन फीचरमुळे यूजर्सना त्यांच्या स्टेटसवर अधिक नियंत्रण मिळणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये यूजर्स ठरवू शकतील की त्यांचे स्टेटस नेमके कोण पुन्हा शेअर करू शकते.

WABetaInfo च्या माहितीनुसार, हे फीचर अँड्रॉईड व्हर्जन २.२५.२७.५ साठी WhatsApp बीटा अपडेटमध्ये दिसून आले आहे. या फीचर अंतर्गत, यूजर्सना "Allow sharing" असा एक टॉगल बटण मिळेल. जर यूजर्सने ते चालू केले तर इतरांना त्यांचे स्टेटस पुन्हा शेअर करण्याची परवानगी मिळेल. जर तो पर्याय बंद ठेवला गेला तर कोणालाही ते रीशेअर करता येणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे हे फीचर डीफॉल्टनुसार बंदच असेल आणि यूजर्सनी इच्छेनुसार ते मॅन्युअली चालू करावे लागेल.

नवीन फिचरमुळे यूजर्सना नेमके कोणाला आपला स्टेटस पाहू द्यायचा आणि कोणाला रीशेअर करण्याची मुभा द्यायची हे ठरवण्याची सोय होणार आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीला आपला स्टेटस फक्त निवडक लोकांनाच दाखवायचा असेल, तर त्याच लोकांना रीशेअर करण्याचा पर्याय दिला जाईल. रीशेअर केलेल्या स्टेटससाठी गोंधळ टाळण्यासाठी स्क्रीनच्या वर भागात "reshared" असे लेबल केले जाईल. तसेच, जेव्हा एखादे स्टेटस पुन्हा शेअर केले जाते तेव्हा मूळ स्टेटस तयार करणाऱ्या यूजर्सला नोटिफिकेशनही मिळणार आहे.

मात्र, यामध्ये एक महत्त्वाचा प्रायव्हसीचा बदल आहे. रीशेअर झाल्यानंतर मूळ यूजर्सची वैयक्तिक माहिती किंवा ओळख पुन्हा शेअर करणाऱ्याच्या संपर्कांना दिसणार नाही. यामुळे यूजर्सची माहिती सुरक्षित ठेवली जाईल आणि प्रायव्हसीला अधिक महत्त्व दिले जाईल.

या नव्या अपडेटमुळे WhatsApp आपल्या यूजर्सना अधिक प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य देत आहे. स्टेटसवर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचवेळी आपला कंटेंट नेमक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल. कंपनीच्या या उपक्रमामुळे WhatsApp यूजर्सना अधिक सुरक्षित आणि वैयक्तिक अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT