ज्यावेळी इन्कम टॅक्स वाचवण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण कलम 80 सी आणि 80 डी चा विचार करतो. बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती आहे. 80 सी अंतर्गत आपण आपल्या एकूण उत्पन्नातून 1.5 लाख रुपयांची कपात मिळवू शकता, तर कलम 80 डी वैद्यकीय खर्चावरील कपातीसाठी आहे. पण या व्यतिरिक्त आयकर कायद्यात अशी अनेक कलमं आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या उत्पन्नावर कर वाचवू शकता.
बहुतेक लोकांना असं वाटतं की, 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, जे योग्य नाही. प्रत्यक्षात अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करसवलतीच्या कक्षात येतं. यानंतर कलम ८७ ए अंतर्गत २.५ लाख रुपयांपर्यंत १२५०० रुपयांपर्यंत सूट मिळते. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 5 लाखांच्या पगारावर करसवलतीचा लाभ मिळतो.
याशिवाय कलम ८० सी अंतर्गत टर्म इन्शुरन्स, ५ वर्षांची एफडी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि ईएलएसएस म्युच्युअल फंड यांसारख्या योजनांमध्ये १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळू शकते.
आपण स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि अवलंबून पालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विमा हप्ता घेऊन आपल्या उत्पन्नावरील कर वाचवू शकता. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर या सेक्शनअंतर्गत तुम्ही स्वतःसाठी, लाईफ पार्टनरसाठी आणि मुलांसाठी प्रीमियम भरून 25,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
60 वर्षांवरील व्यक्तींना कलम 80 डी अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कपात मिळू शकते. तर, करदाते आणि त्याचे आई-वडील दोघेही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील तर 1 लाख रुपयांपर्यंत कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
कलम 80D मध्ये preventive health तपासणीसाठी केलेल्या कोणत्याही रकमेसाठी 5,000 रुपयांची वजावट समाविष्ट आहे. ही वजावट रु. 25,000 रु. 50,000 च्या एकूण मर्यादेत असेल. जशी परिस्थिती असेल. या वजावटीचा व्यक्ती स्वतःसाठी, त्याच्या जोडीदारासाठी किंवा पालकांसाठी देखील दावा करण्यात येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.