विवो कंपनीने अलीकडेच Vivo T3 Ultra लाँच केला. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि 5500 एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आलीय. यानंतर, कंपनी आणखी एक अल्ट्रा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारीत आहे. या फोनच्या प्रोसेसरसह अनेक माहिती समोर आलीय.
हा Vivo फोन दमदार फीचर्ससह लाँच केला जाईल. Vivo T सिरीजचा हा फोन T4 Ultra नावाने बाजारात आणणार असा दावा केला जात आहे. Vivo T3 Ultra भारतात 27,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला. त्याचे अपग्रेड केलेले मॉडेल भारतात त्याच किमतीच्या श्रेणीत आणले जातील असं म्हटलं जातंय.
या फोनबद्दल एका नेटकरीने माहिती शेअर केलीय. हा फोन ६.६७-इंचाच्या pOLED डिस्प्लेसह येईल. ज्यामध्ये 120 हर्ट्झ हाय रिफ्रेश रेटचा सपोर्ट उपलब्ध असेल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 (MediaTek Dimensity 6300) प्रोसेसरसह दिला जाण्याची शक्यता आहे.
विशेष गोष्ट म्हणजे, या विवो फोनच्या कॅमेऱ्यातही अपग्रेड करण्यात येईल. यात 50 मेगा पिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच 50 एमपी अल्ट्रा वाइड आणि 50 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा या फोनमध्ये देण्यात येण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 50 एमपी कॅमेरा देखील मिळू शकतो.
या फोनचे फीचर्स हा फोन 6.78 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. यात 120Hz हाय रिफ्रेश रेट सपोर्ट मिळत असतं. विवोच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर देण्यात आलाय. यात 50MP वाला रिअर कॅमेरा देण्यात आलाय. यात OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशनचा सपोर्ट करते. तर फोनमध्ये 50 MP वाला सेल्फी कॅमेऱ्यासह स्मार्टफोन 5500mAh ची क्षमता असलेली बॅटरी देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.