vivo T3x 5G
vivo T3x 5G Saam Tv
बिझनेस

6000mAh ची दमदार बॅटरी, 50MP चा कॅमेरा, Vivo चा नवीन स्मार्टफोन लॉन्च; स्वस्तात मस्त फोन

साम टिव्ही ब्युरो

Vivo T3x 5G smartphone launched in India:

Vivo ने आपला नवीन Vivo T3x 5G बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत 13,499 रुपयांपासून सुरू होते. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. खास गोष्ट म्हणजे परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट आहे. हा फोन Flipkart, Vivo India Store वरून 24 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Vivo T3x 5G किंमत

4GB + 128GB – 13,499 रुपये

6GB + 128GB – 14,999 रुपये

8GB + 128GB – 16,499 रुपये

हा फोन HDFC आणि SBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळेल.

नवीन vivo T3x 5G 6.72-इंचाच्या FHD+ अल्ट्रा व्हिजन डिस्प्लेसह येतो. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले 1000 ब्राइटनेस निट्सने सुसज्ज आहे. म्हणजेच तुम्ही सूर्यप्रकाशातही फोन सहज वापरू शकता. फोनची डिझाइन याचा प्लस पॉईंट आहे. फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. फोन 3.5mm ऑडिओ जॅक सह येतो.

कॅमेरा

फोटो आणि व्हिडिओसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर आणि बॅटरी

नवीन vivo T3x 5G मध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा एक चांगला प्रोसेसर आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. जी 44W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. या फोनमधील स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala Accident : खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दाेघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Madhya Pradesh Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Today's Marathi News Live : इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम रईसी यांचा अपघाती मृत्यू, केंद्र सरकारकडून १ दिवसाचा राजकीय दुखवटा

Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार

Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT