Vande Bharat Ticket Saam Tv
बिझनेस

Vande Bharat Ticket: रेल्वेचा मोठा निर्णय! आता १५ मिनिट आधी करता येणार वंदे भारतचं तिकीट बुक; नवीन नियम काय?

Vande Bharat Ticket Booking New Rule: वंदे भारत एक्सप्रेसने तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल केले आहे. आता तुम्ही फक्त १५ मिनिटेआधी तिकीट बुक करु शकणार आहात.

Siddhi Hande

वंदे भारत ही देशातील सर्वात वेगाने धावणारी एक्सप्रेस आहे. वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला आहे. अनेक प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दिली आहे. दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट खूप जलद बुक होतात. दरम्यान, आता तुम्ही शेवटच्या क्षणीदेखील तिकीट बुक करु शकतात. यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

१५ मिनिट आधी करता येणार तिकीट बुक (You Can Book Vande Bharat Ticket Booking Just 15 Minutes Before)

आता प्रवास १५ मिनिटं आधी तिकीट बुक करु शकतात. जर एक्सप्रेसमध्ये जागा उपलब्ध असेल तर तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे. हा निर्णय तातडीने प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. याआधीच्या नियमांमध्ये तुम्हाला आगाऊ तिकीट बुक करणं बंधनकारक होते. आता या बदलामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

नवीन नियम काय आहेत? (Vande Bharat Ticket Booking Rule)

तुम्हाला IRCTC ची वेबसाईट, मोबाइल अॅप किंवा रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट बुक करायचे आहे. तुम्हाला फक्त १५ मिनिटे आधीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे.

सध्या गोरखपूर-प्रयागराज वंदे भारतसाठी हे तिकीट उपलब्ध आहे. लवकरच इतर मार्गांवरदेखील हा नियम सागू होईल.

काही निवडक एक्सप्रेसमध्ये ८ ते १६ कोच वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी अधिक जागा उपलब्ध होतील.

याआधी वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट बुक करायचे असेल तर वेळमर्यादा होत्या. त्यामुळे जर अचानक कोणाला प्रवास करायचा असेल तर त्यांना खूप अडचणी निर्माण व्हायच्या. परंतु आता हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कुलदीप तिवारी यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तातडीच्या प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT