बिझनेस

Vande Bharat Train: रेल्वेचा कोच की हॉटेलचा रुम! वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Vande Bharat Sleeper Train Inside Video: आता रेल्वे प्रवास वेगवान होण्यासह भन्नाट होणार आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांना हॉटेलसारखं वाटणार आहे. किनेट सोल्युशन्सने डिझाइन केलेले प्रथम श्रेणीचे लक्झरी कोच प्रवाशांना भन्नाट अनुभव देणार आहे. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • वंदे भारत स्लीपर कोचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • किनेट सोल्युशन्सनं तयार केलेल्या या कोचचं प्रदर्शन दिल्लीमध्ये करण्यात आलंय.

  • भारतीय रेल्वेचं आधुनिक आणि आलिशान रूप पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

वंदे भारतचा नवीन स्लीपर कोच मधील प्रवास सर्वात भारी प्रवास असणार आहे. ही ट्रेन लवकरच धावणार आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांचा अनुभव आणखी आलिशान बनववण्यास सज्ज झालीय. २०१९ मध्ये लाँन्च झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन स्लीपर व्हर्जन आता तयार झाले आहे. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या १६ व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात भारत-रशिया संयुक्त उपक्रम किनेट सोल्युशन्सने (IREE) आपला १AC कोच लाँन्च केलाय. यावेळी एका व्लॉगरने ट्रेनच्या फर्स्ट-क्लास स्लीपर कोचचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनमधील सर्व सुविधा आणि प्रभावी डिझाइन दाखवले आहेत. स्लीपर 'वंदे भारत'चा आतील भाग अद्भुत आहे असं व्लॉगरने व्हिडिओमध्ये सांगितलंय. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना @journeyswithak ने लिहिले की, 'वंदे भारतचे स्लीपर फर्स्ट क्लास केबिन आहे, यात लक्झरी आणि तंत्रज्ञानाचा संगम झालाय असं त्याने म्हटलंय.

आकर्षक डिझाइन, आरामदायी स्लीपर कोच आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हे केबिन अत्यंत आकर्षक बनलंय. दरम्यान व्लॉगरच्या या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाख व्ह्यूज, ५९ हजार लाईक्स आणि ७००+ कमेंट्स मिळाल्या आहेत.

या ट्रेनमध्ये -

आरामदायी जागा.

रीडिंग लाइट.

चार्जिंग पॉइंट्स.

पाण्याच्या बाटलीची जागा.

नवीन वंदे स्लीपर ट्रेन ताशी १६० ते १८० किमी वेगाने धावू शकते. या ट्रेनची रचना आधुनिक, प्रवासी-अनुकूल आणि आकर्षक बनवण्यात आली आहे.

ट्रेन कोणी बनवली? (Vande Bharat 1AC features)

बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) ने चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) येथे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती केली आहे. यात एकूण १६ कोच असतील, ज्यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी २ टायर आणि एसी ३ टायरचा समावेश असणार आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर खूप कमेंट्स केल्या आहेत. काहींनी लिहिले, "मला पायऱ्या खूप आवडल्या, खूप छान." दुसऱ्या एका युझरने लिहिले की, “देश बदलत आहे, पण लोक?” तर तिसरा युझर म्हणाला “खरी टेस्ट यूपी आणि बिहारमधील लोकांकडून घेतली जाईल.” वंदे भारत स्लीपर ट्रेनची स्वच्छता, डिझाइन आणि सोयीसुविधेचे सर्वजण कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये धक्का लागण्याच्या वादातून ओला चालकाला बेदम मारहाण

Indurikar Maharaj : साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार;ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज भडकले,VIDEO

Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT