Vande Bharat Express to offer ticket booking just 15 minutes before departure saam Tv
बिझनेस

Vande Bharat news: अरे वा! प्रवासाच्या १५ मिनिटे आधीच बुक करू शकता वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vande Bharat Train Ticket Booking: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा जाहीर करण्याच्या विचारात आहे. यापूर्वी, दक्षिण रेल्वेने अलीकडेच अशी सेवा सुरू केली आहे.

Bharat Jadhav

जर तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना आधीच तिकीट काढावे लागते. परंतु वंदे भारत रेल्वेचं तिकीट आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या फक्त १५ मिनिटे आधीही बुक करू शकता.

अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार, पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. लवकरच ही सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण रेल्वेने १७ जुलैपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून अशी सेवा सुरू केलीय. यामध्ये, आठ वंदे भारत गाड्यांसाठी ही 'करंट बुकिंग' सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.

आता प्रवासी या गाड्यांमध्ये मध्यवर्ती स्थानकांवरूनही रिकाम्या जागांच्या आधारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात, तेही त्या स्थानकावरून ते पण ट्रेन सुटण्याच्या १५ मिनिटे आधी. सध्या, ही सेवा मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस आणि तिच्या परतीच्या वाहतूक सेवेसारख्या गाड्यांमध्ये सुरू करण्यात आलीय. पूर्वीच्या प्रणालीनुसार, ट्रेनने तिचे सोर्स स्टेशन सोडताच, पुढील स्थानकांवरून तिकीट बुकिंगची सुविधा बंद केली जात होती, परंतु आता या नवीन प्रणालीमुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, जर दक्षिण रेल्वेमध्ये हे यशस्वी झाले. तसेच या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर अहमदाबादसह संपूर्ण पश्चिम रेल्वेमध्ये ते लागू केले जाणार आहे. अहमदाबाद मिररमधील वृत्तानुसार मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या विभागांतर्गत धावणाऱ्या आठ वंदे भारत गाड्यांमध्ये ही सुविधा लागू करण्यात आलीय.

जागांच्या उपलब्धतेवर ही सुविधा अवलंबून आहे. प्रवासी ही तिकिटे ऑनलाइन देखील बुक करू शकतात. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे विशेषतः टियर-२ शहरे आणि लहान शहरांमधील प्रवाशांना फायदा होईल. यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा मिळेल. तसेच प्रीमियम गाड्यांमध्ये रिकाम्या जागांची संख्या कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT