Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आई-बाप फक्त दहावी पास, पण लेकीला सरकारी अधिकारी केलं; मालेगावच्या प्रेरणाची UPSCत भरारी, वाचा सक्सेस स्टोरी

Success Story of Malmatha Girl Prerna Khavle: माळमाथ्याच्या प्रेरणा खवळे यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी ९१३ रॅंक प्राप्त केली आहे. मोठ्या जिद्दीने त्यांनी हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षेत माळमाथ्याच्या लेकीी बाजी

प्रेरणा खवळे यांनी मिळवली ९१३ रॅंक

शेतकऱ्याच्या लेकाने जिद्दीने मिळवलं यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये अनेक तरुणांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातीलदेखील अनेक तरुणांना यश मिळाले आहे. माळमाथ्याच्या प्रेरणा खवळे यांनीदेखील यूपीएससी परीक्षा पास केली आहे. शेतकऱ्याच्या लेकीने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

मालेगावातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे व सुनिता खवळे यांची लेक प्रेरणा खवळे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. देशात ९१३ रॅंक मिळवली आहे. माळमाथासारख्या अवर्षणप्रवण भागातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झेप घेणारी पहिली लेक ठरली आहे.तिच्या या यशाबद्दल माळमाथा व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

लेकीच्या शिक्षणासाठी आईवडिलांची मेहनत

खवळे दाम्पत्याचे अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे शिक्षण मालेगावात व्हावे, यासाठी प्रयत्नशील होते.प्रेरणासह एकूण चार भावंडे आहेत. प्रेरणा यांचे प्राथमिक शिक्षण कॅम्प भागातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या भारत विद्यालयात झाले. नवोदय परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी खेडगाव ( ता. दिंडोरी) येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले.

प्रेरणाच्या आयुष्याला बारावीनंतरच कलाटणी मिळाली अन् तिच्या स्वप्नांना बळ मिळाले, असे त्यांनी सांगितले. आई वडिलांची लहानपणापासूनच इच्छा होती की, आपल्या लेकीने 'कलेक्टर' व्हावे त्यादृष्टीने तिच्याकडे लक्ष देऊन शिक्षण देत होते. पदवीच्या शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले तेथील आरसीएसएम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मधुन बीएसस्सी ॲग्रिकल्चर पदवी संपादन केली.

पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत सलग चार वर्षांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पाठलाग करत असताना तीनवेळा अपयश आले,पण अपयशाने खचून न जाता जिद्दीने चौथ्या वेळी देशात ९१३ रँकने उत्तीर्ण झाली. मोठी स्वप्ने नक्कीच बघायला हवीत. त्यासाठी जिद्द चिकाटी व सातत्य महत्त्वाचे आहे. अपयशाने खचू नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. यशाचा पाठलाग करा, योग्य दिशा व मार्गदर्शन यामुळे यश हमखास मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT