Major financial and digital rule changes will come into force across India from January 1. saam tv
बिझनेस

नव्या वर्षात ५ गोष्टींच्या नियमात होणार मोठा बदल; UPI ते आधार कार्डमध्ये काय होणार बदल?

UPI PM Kisan Salary Aadhaar-PAN Rule: एक जानेवारीपासून UPI, PM किसान योजना, सरकारी पगार आणि आधार-पॅन लिंकिंगशी संबंधित मोठे नियम बदल लागू होतील. हे बदल सामान्य नागरिकांवर कसा परिणाम करतील ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • १ जानेवारीपासून UPI आणि डिजिटल व्यवहारांचे नवे नियम लागू

  • पीएम किसान योजनेत लाभासाठी कागदपत्रे अपडेट असणे आवश्यक

  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी बदल

नवीन वर्ष सुरू होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेत. नवीन वर्षात अनेकजण नव्या गोष्टींना, नव्या कामाला सुरुवात करतात. या नव्या वर्षात आर्थिक नियमांमध्येही बदल लागू होणार आहेत. १ जानेवारी २०२६ पासून अनेक आर्थिक नियमात बदल केले जाणार आहेत. याचा सर्वसामन्य लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. यामुळे कोणकोणत्या गोष्टींच्या नियमात बदल होणार आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. नियम बदलण्यात येणाऱ्या गोष्टींमध्ये UPI, PM किसान, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि आधार-पॅन लिंकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

UPI

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी, बँक खात्यांद्वारे केलेल्या UPI आणि इतर डिजिटल पेमेंटसाठीचे नियम कडक केले जाणार आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी, मोबाईल सिम पडताळणीचे नियम कडक केले जाणार आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल.

पीएम किसान

प्रधानमंत्री किसान योजना अर्थात पंतप्रधान सन्मान शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता एका आयडीची गरज लागेल. हे किसान आयडी असते. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा. बनावट लाभार्थी ओळखण्यासाठी हे बदल केले जात आहेत.

आठवा वेतन आयोग

१ जानेवारीपासून देशभरात आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. आठव्या वेतन आयोगांतर्गत, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार आणि पेन्शन वाढवणार आहे. जे त्यांना नंतर थकबाकीसह ज्याला तुम्ही एरियर म्हणतात ते दिले जाणार आहे.

आधार-पॅन जोडणे

आधार आणि पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर एखाद्या व्यक्तीने ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर त्यांचा पॅन क्रमांक १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल.

गॅस सिलिंडर, पीएनजी, सीएनजीच्या किमती बदलणार

यासह एलपीजी गॅस सिलिंडर, पीएनजी, सीएनजी आणि एटीएफ (विमान इंधन) च्या नवीन किमती १ जानेवारी रोजी जाहीर केल्या जातील. एलपीजी गॅस सिलिंडर, पीएनजी, सीएनजी आणि एटीएफच्या किमती दर महिन्याला गरजेनुसार सुधारित केल्या जातात. हे नवीन किमती दर महिन्याच्या १ तारखेपासून लागू होतात आणि संपूर्ण महिन्यासाठी लागू राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौतमी पाटील निवडणूक लढवणार? गौतमी पाटील होणार नगरसेविका?

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT