Online Payment Fraud Saam Tv
बिझनेस

UPI पेमेंट करताय? QR कोड स्कॅन करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं बँक अकाउंट रिकामं

Online Payment Fraud: सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे. डिजिटल पेमेंटमुळे एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर होतात. परंतु अनेकदा क्यू आर कोड स्कॅन केल्याने फ्रॉड होऊ शकतात.

Siddhi Hande

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. अनेकजण ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंटमुळे एका मिनिटांत पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाही.भाजीपाला घेण्यापासून ते अगदी हॉटेलमध्ये बिल देताना यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो. यूपीआय पेमेंट जेवढे सोपे आहे तेवढेच ते जोखमीचेदेखील आहे.

यूपीआयचा क्यूआर कोड वापरताना नेहमी काळजी घ्यायची असते.क्यू-आर कोड स्कॅन करताना अनेकदा स्कॅम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

QR कोडमुळे होऊ शकतात स्कॅम

अनेकदा आपण घाईगडबडीत क्यू आर कोड स्कॅन करतो. परंतु अनेकदा काही स्कॅमर्स याकडे लक्ष देऊन असतात. अनेकदा खोटा क्यूआर कोड स्कॅन करतात. परंतु हा क्यूआर कोड नसतो तर मालवेअर फाइल डाउनलोड करण्यासाठी क्यूआर कोड असतो.

एकदा तुम्ही लिंकवर क्लिक केले तर तुमच्या फोनमध्ये काही प्रोग्राम इ्नस्टॉल होतात. त्यामुळे तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते. यात तुमच्या बँक अकाउंटची माहितीदेखील लिक होऊ शकते. यामुळे नेहमी क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्यायची असते. जर तुम्ही चुकीचे क्यूआर कोड स्कॅन केले तर तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते.काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीसोबत असा स्कॅम झाला होता.

सावधगिरी बाळगा

QR कोड स्कॅम करण्याआठी रिसीवरचे नाव आणि इतर माहिती पाहा. त्यानंतरच क्यू आर कोड स्कॅन करुन पेमेंट करा.

कोणतेही डिजिट ट्रान्झॅक्शन करताना घाई करु नका. प्रत्येक लिंक किंवा प्लॅटफॉर्मसा वेरिफाय करा. त्यानंतरच पेमेंट करा.

डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना नेहमी अधिकृत अॅपचा वापर करा. गुगल प्ले किंवा अॅपल प्ले स्टोअरमधील अॅप डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT