Bajaj Chetak 2024 Saam Tv
बिझनेस

Bajaj Chetak 2024: पुन्हा होणार मार्केट जाम! नव्या दमात येतेय 'बजाज चेतक', किंमत असणार 1 लाखांपेक्षा कमी

Upcoming Electric Scooters: स्वदेशी दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट आपल्या लोकप्रिय चेतक लाइनअपमध्ये एक नवीन व्हॅरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Satish Kengar

Upcoming Electric Scooters in India:

गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. बजाज चेतक, ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि अथर यांसारख्या स्कूटर्सचे या सेगमेंटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. याच आता स्वदेशी दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट आपल्या लोकप्रिय चेतक लाइनअपमध्ये एक नवीन व्हॅरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

यातच सरकार इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी हटवण्याचा विचार करत आहे. मात्र याचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही. कारण अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी बजाज चेतकच्या नवीन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगामी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी असल्यास यात काही महत्त्वाचे बदल पहिला मिळू शकतात. आगामी इलेक्ट्रिक स्कूटर लहान बॅटरी पॅक आणि कमी पॉवरफुल मोटरसह लॉन्च केली जाऊ शकते. (Latest Marathi News)

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, किमतीतील कपातीमुळे आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स देखील कमी होतील. याचबद्दल बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, “आम्ही चेतकच्या लाइनअपच्या विस्तारावर काम करत आहेत. अशातच काही काळासाठी सबसिडी काढून घेतल्याने ईव्हीच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.''

चेतकचा नवीन व्हेरियंट एप्रिल किंवा मे मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. बजाज चेतकचा नवीन व्हेरियंट लॉन्च झाल्यानंतर याची स्पर्धा TVS iQube, Ather 450S आणि Ola S1 सारख्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरशी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT