FASTag संबंधित हे काम 1 एप्रिलआधी करा पूर्ण, नाही तर व्हाल ब्लॅकलिस्टेड

FASTag News: टोल प्लाझावर फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या कारचे फास्टॅग केवायसी केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा.
FASTag
FASTag Saam Tv

FASTag Latest Update:

टोल प्लाझावर फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या कारचे फास्टॅग केवायसी केले नसेल तर ते लवकर पूर्ण करा. 31 मार्चनंतर केवायसीशिवाय फास्टॅग निष्क्रिय केले जाईल किंवा बँकेद्वारे ब्लॅकलिस्टेड केले जाईल. यानंतर फास्टॅगमध्ये बॅलन्स असला तरीही पेमेंट करता येणार नाही. फास्टॅग केवायसी करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ...

अलीकडेच NHAI ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड होणार नाही, याची खात्री करण्यासाठी 31 मार्चआधी तुम्हाला तुमचे फास्टॅग केवायसी अपडेट करावे लागणार आहे. तुम्हाला फास्टॅग केवायसी करायचे असल्यास, तुमच्याकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

FASTag
Samsung Galaxy Book 4 लॅपटॉप इंटेल प्रोसेसरसह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

फास्टॅग केवायसी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला फास्टॅगच्या अधिकृत वेबसाइट fastag.ihmcl.com वर जावे लागेल.

  • यानंतर केवायसी पर्यायावर जा.

  • Customer Type वर क्लिक करा. (Latest Marathi News)

  • नंतर Declaration बॉक्सवर क्लिक करून केवायसी अपडेट प्रक्रियेसाठी पुढे जा.

  • येथे आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमचा पत्ता भरा.

  • विनंती केलेली माहिती सबमिट करण्यापूर्वी सर्वकाही काळजीपूर्वक तपासा.

FASTag
Samsung Smartphone : भारतीय युजर्ससाठी आनंदाची बातमी! सॅमसंग लवकरच लॉन्च करणार AI आणि हायपर कनेक्टीव्हिटी

फास्टॅग केवायसी करण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया

यासाठी त्या व्यक्तीला बँकेत जावे लागेल. या प्रक्रियेसाठी पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

  • बँकेतून फास्टॅग केवायसी फॉर्म घ्या.

  • फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.

  • बँकेकडून फॉर्मची पडताळणी केली जाईल.

  • यानंतर संबंधित व्यक्तीला ईमेल आणि एसएमएसद्वारे सूचना मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com