Sunroof Cars Saam Tv
बिझनेस

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Upcoming Cars: मारुती सुझुकी आता पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात आपली नवीन डिझायर फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. या कारबाबत काही नवीन माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Maruti Dzire:

मारुती सुझुकी आता पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात आपली नवीन डिझायर फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. या कारबाबत काही नवीन माहिती समोर आली आहे. डिझायरमध्ये ग्राहकांना सनरूफ मिळू शकतो. या कारमध्ये सनरूफची सुविधा मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल.

टेस्ट दरम्यान ही कार अनेकदा पाहिली गेली आहे. यावेळी त्याच्या डिझाईनमध्येही अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. भारतात ही कार होंडा अमेझ, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगोर सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल. नवीन Dzire बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Dzire ला आता पहिल्यांदाच सनरूफ मिळणार आहे. आजकाल सनरूफला खूप मागणी आहे. ज्या प्रकारात सनरूफ बसवले जाईल त्याची किंमतही वाढणार आहे. अलिकडेच मारुतीने नवीन स्विफ्ट सादर केली होती, ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे.

मारुती आपल्या नवीन Z-Series 3 सिलिंडर इंजिन नवीन Dzire मध्ये देऊ शकते. मारुतीने सांगितले की, नवीन इंजिन 14 टक्के अधिक मायलेज देते. हेच इंजिन नवीन स्विफ्टमध्येही देण्यात आले आहे. हे 1.2 लीटर इंजिन 82 hp पॉवर आणि 112 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. नवीन डिझायरमध्ये पॉवर आणि टॉर्कमध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात, असं बोललं जात आहे.

नवीन डिझायरमध्ये पेट्रोल आणि सीएनजीचे पर्याय उपलब्ध असतील. सूत्रानुसार, ही कार 25kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. तर CNG मोडवर याचे मायलेज 31km च्या पुढे जाऊ शकते. नवीन Dezire मध्ये 378 लीटरची मोठी बूट स्पेस असेल. डिझायरच्या नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेल (Dzire) पेक्षा थोडी जास्त असू शकते. सध्याच्या Dzire ची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT